मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून आदित्य ठाकरेंना उतरवण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरे भडकले

पंतप्रधानांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्र्यांसोंबत आदित्य ठाकरे देखील निघाले होते. मात्र,
मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून आदित्य ठाकरेंना उतरवण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरे भडकले
ANI

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी आयएनएस शिक्रा येथे पोहोचले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी उद्धव ठाकरे पोहोचल्यानंतर सुरक्षा व्यवस्थांनी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं कळतंय. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेनं आदित्य ठाकरेंना गाडीतून उतरवल्याची माहिती कळतेय. आदित्य ठाकरे हे राजशिष्ठाचार मंत्री असल्यानं ते मुख्यमंत्र्यासोबत नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहण्यासाठी निघाले होते. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेनं आदित्य ठाकरेंना उतरवण्याचा प्रयत्न केल्यानं उद्धव ठाकरे भडकले असल्याचं कळतंय.

नेमकं काय घडलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातील देहू येथील कार्यक्रमानंतर मुंबईत विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी आले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: हजर राहिले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आयएनएस शिक्रा येथे स्वागत केलं. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्र्यांसोंबत आदित्य ठाकरे देखील निघाले होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेकडून आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून उतरवण्याचा प्रयत्न झाला. उद्धव ठाकरे या प्रकारामुळं सुरक्षा व्यवस्थेवर संतापल्याची माहिती आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यापूर्वी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले त्यावेळी राजशिष्टाचार मंत्री म्हणून आदित्य ठाकरे उपस्थित राहिले होते. मात्र, यावेळी नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे एकाच ठिकाणी असताना आदित्य ठाकरेंना उतरवण्याचा प्रयत्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आयएनएस शिक्रा पाँईंटवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वागतासाठी पोहोचलं होते. आदित्य ठाकरे राजशिष्टाचार मंत्री म्हणून तिथं पोहोचले होते. मात्र, पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेनं आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून उतरवण्याचा प्रयत्न झाल्यानं उद्धव ठाकरे संतापले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in