अजय महाराज बारसकर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांचे एकेकाळचे सहकारी अजय महाराज बारसकर यांनी जरांगेंवर गंभीर टीका केली
अजय महाराज बारसकर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न

विशाल सिंह/मुंबई : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांचे एकेकाळचे सहकारी अजय महाराज बारसकर यांनी जरांगेंवर गंभीर टीका केली. आता बारसकर यांच्यावर मुंबईत शुक्रवारी रात्री चार जणांनी हल्ल्याचा प्रयत्न केला. पण, मरीन ड्राईव्ह पोलिसांनी तात्काळ कारवाई करून चौघांना अटक केली.

मराठा आरक्षण आंदोलनात अजय महाराज बारसकर यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. २०१६ मध्ये मराठा क्रांती मूक मोर्चाचे समन्वयक म्हणून त्यांनी काम पाहिले. सध्या बारसकर हे चर्चगेटच्या ॲस्टेरिया हॉटेलमध्ये राहत आहेत. शुक्रवारी अज्ञात तरुणांनी त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. ते हल्लेखोर मराठा समाजाचे होते. पण, हॉटेलमधील साध्या वेशातील पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने ते पळून गेले. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्याविरोधात बारसकर यांनी टीका केल्याने त्यांच्यावर हल्ला झाला असावा, असा अंदाज आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in