शिवसैनिकांना पुरस्कारांच्या माध्यमातून आकर्षित करण्याचा प्रयत्न; जुन्या-ज्येष्ठ शिवसेना नेत्यांच्या नावाने शिवसन्मान

राज्यातील जुने आणि ज्येष्ठ शिवसैनिक आकर्षित करण्याचा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न असल्याचे मानण्यात येते.
शिवसैनिकांना पुरस्कारांच्या माध्यमातून आकर्षित करण्याचा प्रयत्न; जुन्या-ज्येष्ठ शिवसेना नेत्यांच्या नावाने शिवसन्मान

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे दोन दिवसीय महाअधिवेशन पार पडले. त्यात इतर ठरावांसोबतच शिवसेना नेत्यांची आठवण म्हणून पाच वार्षिक शिवसन्मान पुरस्कार देण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला आहे. दत्ताजी साळवी, प्रमोद नवलकर आदी नेत्यांचा यात समावेश आहेच, पण दादा कोंडके यांच्या नावानेही पुरस्कार देण्यात येणार आहे. राज्यातील जुने आणि ज्येष्ठ शिवसैनिक आकर्षित करण्याचा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न असल्याचे मानण्यात येते.

महाअधिवेशनात झालेल्या एका ठरावानुसार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून ज्या शिवसेना नेत्यांनी पक्षासाठी अहोरात्र काम केले अशा नेत्यांची आठवण आणि त्यांना अभिवादन म्हणून दरवर्षी पाच शिवसन्मान पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी हा ठराव मांडला होता. उत्कृष्ट कामगार पुरस्कार दत्ताजी साळवी यांच्या नावे, नाविन्यपूर्ण उदयोन्मुख उद्योजक सुधीर जोशी यांच्या नावे, उत्कृष्ट पत्रकार प्रमोद नवलकर, कला क्षेत्र पुरस्कार दादा कोंडके, शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार वामनराव महाडिक यांच्या नावे देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे ज्येष्ठ शिवसैनिक यांना आकर्षित करण्याचा हा प्रयत्न असल्याचे मानण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in