चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ४७ मिलीमीटर पाऊस ; पाच तालुक्यात अतिवृष्टीची नोंद

चिमूर तालुक्यातील पांजरेपार गावातील नाल्याला पूर आल्याने या पुराचं पाणी गावात शिरलं आहे
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ४७ मिलीमीटर पाऊस ; पाच तालुक्यात अतिवृष्टीची नोंद
Hp

चंद्रपूर जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीचं पाणी झालं आहे. गेल्या २४ तासांपासून पासून सुरु आहे. चंद्रपूरमध्ये २४ तासात झालेल्या पावसामुळे ४७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकणू पाच तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तर चिमूर तालुक्यातील पांजरेपार गावातील नाल्याला पूर आल्याने या पुराचं पाणी गावात शिरलं आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ४७ मिलिमीरटर पाऊस पडल्याने नदी नाले तुडूंब भऱुन वाहू लागले आहेत. जिल्ह्यीतील पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यात सावली तालुक्यात १४३ मिमी, नागभीडमध्ये १२३ मिमी ब्रम्हपुरी ८५ मिमी, सिंदेवाहीमध्ये ७० मिमी तर पोंभूरणा तालुक्यात ६६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

या अतिवृष्टी सदृश्य पावासामुळे चंद्रपुर जिल्हाातील नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. शंकरपूर येथून जवळच असलेले पांजरेपार या गावात पुराचं पाणी शिरलं आहे. काल रात्री झालेल्या पावसामुळे पांजरेपार गावाशेजारी असलेल्या नाल्याला पूर आल्याने सकाळीच्या सुमारास गावाला पुराचा वेढा पडला. यामुळे गावातील काही घरात पुराचं पाणी शिरलं. आता पावसाचा जोर उतरल्याने पुराचं पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे.

या मुसळधार पावसामुळे सावली तालुक्यातील चारगाव नदीलाही पूर आला आहे. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे चारगाव येथील पुलावरुन देखील पाणी वाहत आहे. यामुळे सावली ते चारगाव, भारपायली, मानकापूर मेटेगाव, पांढरसराड रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in