लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान

सोहळ्याला शरद पवार उपस्थित राहणार
लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणाऱ्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार की नाही, यावरून गेले काही दिवस चर्चा रंगली होती. मात्र, या सोहळ्याला शरद पवार हे उपस्थित राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ‘टिळक पुरस्कारासाठी मी स्वत:च पंतप्रधानांची वेळ मिळवून दिली असल्याने तेथे जाणे हा माझा नाईलाज आहे,’ असे खुद्द पवार यांनी सांगितल्याचा दावा युक्रांदचे डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केला आहे.

मोदी यांना मंगळवारी (१ ऑगस्ट) प्रदान करण्यात येणाऱ्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. भाजपने शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीत फूट पाडल्याने तसेच याच दिवशी संसदेत दिल्ली अध्यादेशासंबंधी विशेष विधेयक असल्याने शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का, असा सवाल केला जात होता.

logo
marathi.freepressjournal.in