महाराष्ट्रात काँग्रेसला पुन्हा धक्का, बाबा सिद्दीकी यांनी पक्ष सोडला; म्हणाले - 'काही गोष्टी न सांगितलेल्याच बऱ्या'

माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पक्षाला सोडचिट्ठी दिल्यानंतर आता महाराष्ट्रात काँग्रेसला अजून एक धक्का बसला आहे. गुरूवारी सकाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी पक्षाचा राजीनामा दिला.
महाराष्ट्रात काँग्रेसला पुन्हा धक्का, बाबा सिद्दीकी यांनी पक्ष सोडला; म्हणाले - 'काही गोष्टी न सांगितलेल्याच बऱ्या'

माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पक्षाला सोडचिट्ठी दिल्यानंतर आता महाराष्ट्रात काँग्रेसला अजून एक धक्का बसला आहे. गुरूवारी सकाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी पक्षाचा राजीनामा दिला. बाबा सिद्दीकी अजित पवार यांच्या गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी सिद्दीकी यांनी पक्ष सोडल्याचा काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

'आज मी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे', अशी घोषणा बाबा सिद्दीकी यांनी सोशल मीडियावर केली. "मी तरुणपणी काँग्रेस पक्षात सामील झालो. 48 वर्षांचा हा महत्त्वाचा प्रवास होता. आज मी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. माझ्याकडे बोलण्यासारखे बरेच काही आहे, पण ते म्हणतात ना काही गोष्टी न सांगितलेल्याच बऱ्या...या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो", अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

कोण आहेत बाबा सिद्दीकी?

बाबा सिद्दीकी यांची 'इफ्तार पार्टी'साठी वेगळी ओळख आहे. त्यांच्या इफ्तार पार्टीत राजकारणापासून चित्रपट जगतातील अनेक बड्या व्यक्ती सहभागी होतात. सिद्दीकी वांद्रे पश्चिम मतदारसंघातून तीन वेळचे आमदार आहेत. तसेच, अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री व महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष होते. ते 2017 पासून तपास यंत्रणेच्या रडारवर होते. मे 2017 मध्ये, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण घोटाळ्याच्या संदर्भात ईडीने बाबा सिद्दीकींच्या विविध ठिकाणी शोध घेतला होता. 2018 मध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणात, ईडीने त्यांची 462 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in