परभणीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; बाबाजानी दुर्राणी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांमध्ये इन कमिंग, आऊट गोईंग सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे परभणी जिल्ह्यातील तीन वेळचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी गुरुवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व माजी मंत्री अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
परभणीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; बाबाजानी दुर्राणी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
Photo : X (@babajanidurrani)
Published on

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांमध्ये इन कमिंग, आऊट गोईंग सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे परभणी जिल्ह्यातील तीन वेळचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी गुरुवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व माजी मंत्री अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

काँग्रेस पक्षाचे मुख्यालय टिळक भवन येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. बाबाजानी दुर्राणी यांच्यासह परभणीतील माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, जिल्हा बँकेचे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, संचालक व हजारो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.

देशात व राज्यात सध्या अराजक पसरलेले आहे. यातून ‘महाराष्ट्र धर्म’ वाचवण्याची गरज असून बाबाजानी दुर्राणी यांनी देशाला जोडणारा, महाराष्ट्र धर्म वाचवणारा विचार निवडला आहे, असे सपकाळ म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in