
प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचा अमरावतीमध्ये अपघात झाला. रस्ता ओलांडत असताना एका दुचाकीने त्यांना धडक दिली. यामध्ये त्यांना गंभीर जखमा झाल्या असून त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. गेले काही दिवस राज्यातील आमदारांच्या अपघाताची मालिकाच सुरु आहे. अशामध्ये आज सकाळी ६ च्या दरम्यान रस्ता ओलांडत असताना एका दुचाकीस्वाराने धडक दिल्याची माहिती त्यांनी ट्विट करत दिली. पुढचे उपचार करण्यासाठी त्यांना नागपूरमध्ये हलवण्यात आले. सिटी स्कॅन करण्यासाठी त्यांना नागपूरला हलविण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.
आज सकाळी बच्चू कडू यांचा अपघात झाला. दुचाकीने धडक दिल्यानंतर बच्चू कडू रस्त्याच्या दुभाजकावर आदळल्याने डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागला. त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना त्वरित जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्यात आले.
यावेळी त्यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला मार लागला असून डोक्याला ४ टाके पडले असल्याची माहिती डॉक्टरांनी यावेळी दिली. तसेच, संबंधित दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.