बच्चू कडूंची प्रहार विधानसभेच्या २० जागा लढवणार, महायुतीतील सहभागाबाबतही केलं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...

"मी मंत्रिपदावरील दावा सोडला आहे. ते देणारही नाहीत आणि मी..." नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?
बच्चू कडूंची प्रहार विधानसभेच्या २० जागा लढवणार, महायुतीतील सहभागाबाबतही केलं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Published on

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाची मुंबईत बैठक पार पडत आहे. महायुतीत राहायचं की नाही, याचा निर्णय या बैठकीत होऊ शकतो. तर प्रहार विधानसभेच्या वीस जागा लढवणार असल्याची घोषणा बच्चू कडू यांनी केली. तर महायुतीतील सहभागाबाबत सप्टेंबरनंतर निर्णय घेणार असं बच्चू कडू यांनी सांगितलं.

पुढं कसं जायचं, ते सप्टेंबरमध्ये ठरवू...

बच्चू कडू म्हणाले की, "भाजप, शिंदे गट, अजित पवार गट निवडणूकीची तयारी करत आहे. त्यांनी तयारी करावी आणि आम्ही नाही, असं बंधन नाहीये. पुढं कसं जायचं, ते सप्टेंबरमध्ये ठरवू. आम्ही राजकीय पक्ष म्हणून कसं समोर गेलं पाहिजे, हा आमचा निर्णय आहे. एकवर्ष अगोदरच मी मंत्रीपद नाकारलं. मी मंत्रिपदावरील दावा सोडला आहे. ते देणारही नाहीत, मी घेणारही नाही. राजकुमार पटेल यांच्यासाठी आम्ही प्रयत्न करू.

मनोज जरांगेंनी विधानसभा निवडणूक लढवावी...

दरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे सुरु असलेलं उपोषण मनोज जरांगे यांनी एक महिन्यासाठी स्थगित केलं आहे. एक महिन्याच्या आत जर निर्णय घेतला नाही, तर आम्ही निवडणूकीत उमेदवार देऊ, उमेदवार नाही दिले तर नाव घेऊन पाडू, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले होते. यावर बच्चू कडू प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगेंनी विधानसभा निवडणूक लढवावी, त्यांच्या ६०- ७० जागा निवडून येतील, असा दावा बच्चू कडू यांनी केला.

logo
marathi.freepressjournal.in