८० वर्षाच्या आजोबांनी बच्चू कडूंना अडवून विचारले; 'त्या' गुंडांसोबत का गेलात?

आमदार बच्चू कडूंना धाराशिवमध्ये एका ८० वर्षाच्या आजोबांनी अडवलं आणि विचारला जाब, तसेच शिंदे फडणवीसांनादेखील म्हणाले डाकू, व्हिडीओ व्हायरल
८० वर्षाच्या आजोबांनी बच्चू कडूंना अडवून विचारले; 'त्या' गुंडांसोबत का गेलात?

सध्या आमदार बच्चू कडूंचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक ८० वर्षांचे एक वृद्ध शेतकरी त्यांना अडवून जाब विचारताना दिसत आहेत. "शिंदे- फडणवीस हे महाडकु आहेत, तुमची त्यांच्याबरोबर का गेलात?" असा जाब ते विचारात आहेत. धाराशिवमध्ये हा प्रकार घडला असून सोशल मीडियावर या व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

धाराशिवमध्ये काही कामानिमित्त आलेल्या आमदार बच्चू कडूंची गाडी शेतकऱ्यांच्या घोळक्यात अडकली होती. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाददेखील साधला. मात्र, एक वृक्ष शेतकरी त्यांना सुनावताना म्हणाले की, "तुमच्याकडून वेगळ्या अपेक्षा केल्या होत्या, पण तुम्ही चुकीचे वर्तन केले. शिंदे फडणवीस हे महाडाकू असूनसुद्धा तुम्ही त्यांच्याबरोबर गेलात. तुमच्याकडून असे वर्तन अपेक्षित नव्हते. यासाठीच आम्ही तुम्हाला निवडून दिले होते का?" अशा शब्दात त्या वृद्ध शेतकऱ्याने त्यांना सुनावले. त्या शेतकऱ्याचे नाव अर्जुन घोगरे असून ते ८० वर्षांचे आहेत. काहीवेळाने पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर बच्चू कडूंच्या गाडीचा मार्ग मोकळा झाला.

logo
marathi.freepressjournal.in