बच्चू कडू यांनी मंत्रीपदावरील दावा सोडला ; दिल्ली येथे घोषणा करत म्हणाले...

मंत्रीपद न मिळाल्याने वेळोवेळी बच्चू कडू यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती
बच्चू कडू यांनी मंत्रीपदावरील दावा सोडला ; दिल्ली येथे घोषणा करत म्हणाले...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आलेल्या आमदार तसंच प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू हे मंत्रीमंडळ विस्तारात आपल्याला मंत्रिपद मिळेल अशी आस लावून बसले होते. अजूनही मंत्रीपद न मिळाल्याने वेळोवेळी बच्चू कडू यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती. मात्र, अजित पवार गट सत्तेत वाटेकरी झाल्याने अनेकांची मंत्रिपदाची अशा संपुष्टात आली आहे.

बच्चूकडून यांनी पाठपूरावा केल्यानंतर राज्य सरकारने स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची घोषणा केली. यामुळे बच्चूकडू यांनी समाधान व्यक्त केलं होतं. या मंत्रालयाचा कारभार बच्चू कडू यांनाच मिळेल, असं देखील सांगितलं जात होतं. आता अजित पवार गट सत्तेत सामील झाल्याने मंत्रीपदाच्या आशा देखील संपल्या असल्याचं बोललं जाऊ लागलं आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमींवर बच्चू कडू यांनी मंत्रीपदाचा दावा सोडला असल्याचं जाहीर केलं आहे.

आज दिल्ली येथे एनडीएची तर बंगळुरु येते भाजपविरोधी पक्षांची, अशा दोन महत्वाच्या बैठका पार पडणार आहेत. दिल्लीतील एनडीएच्या बैठकीसाठी आमदार बच्चू कडू हे दिल्लीत दाखल झाले आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना कडू यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. १३ जुलै रोजी त्यांनी याबाबत संकेत दिले होते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करुन याबाबतचा निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. आज त्यांनी त्यांचा निर्णय जाहीर केला आहे.

मुख्यमंत्र्याशी चर्चा झाल्याचं बच्चू कडू यांनी यावेळी सांगितल. "40-50 आमदार असून मंत्रीपदं कमी आहेत. मंत्रीपदासाठी आमदारांमध्ये प्रचंड चढाओढ आहे. यात माझी एका मित्राची भूमिका आहे. त्यांनी दिव्यांग मंत्रालय दिलं ही मोठी बाब आहे. त्यांची अडचण दूर झाली पाहीजे म्हणून मी मंत्रीपदाचा दावा सोडला आहे. त्यांनी आग्रह करत तुम्ही मंत्रीपदी हवे आहात असं सांगितलं. मी त्यांना एकंदरीत अडचण असल्याचं सांगत माझ्यापेक्षा दुसरं कुणी खुश होत असेल तर हरकत नाही." असं बच्चू कडू म्हणाले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in