बच्चू कडूंना वादग्रस्त वक्तव्य भोवणार ? गुन्हा दाखल

अनेक कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे, त्यांच्यावर हात उगारणे हा त्यांचा नेहमीचाच उद्योग झाला आहे
बच्चू कडूंना वादग्रस्त वक्तव्य भोवणार ? गुन्हा दाखल

आमदार रवी राणा यांच्या पत्नी आणि आईचा अपमान केल्याने बच्चू कडू यांच्यावर कारवाई करण्याची मागणी महिला मुक्ती आघाडीने केल्यानंतर कडू यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. बच्चू कडू यांनी रवी राणांना प्रत्युत्तर देताना त्यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली होती. याप्रकरणी बच्चू कडू यांच्यावर राजापेठ पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधानातील कलम ५०१ अंतर्गत अब्रूनुकसानीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

बच्चू कडू हे संविधानाचे भान न ठेवता बेजबाबदारपणे वागत आहेत. शासकीय कार्यालयात जाऊन अनेक कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे, त्यांच्यावर हात उगारणे हा त्यांचा नेहमीचाच उद्योग झाला आहे. आमदार हा कर्मचाऱ्यांवर हात उगारत असेल तर तो अकार्यक्षम आहे हे स्पष्ट होते, असे देखील तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in