बैलगाडा प्रेमी पंढरीशेठ फडकेंचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

कार्यालयातून दुपारी घरी जात असताना कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
Pandharisheth Phadake
Pandharisheth Phadake

मुंबई : बैलगाडा शर्यतीतून महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळवलेले 'गोल्डन मॅन' आणि बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीशेठ फडके यांचं निधन झालं. कार्यालयातून दुपारी घरी जात असताना कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

राज्याच्या ग्रामिण भागात बैलगाडा शर्यतीचं वेड अनेकांना आहे. पण पनवेल येथील विहिगर येथील पंढरी फडके यांचे बैलगाडी शर्यतीवर विशेष प्रेम होते. १९८६ पासून वडीलांच्या मार्गदर्शनाखाली फडके यांना बैलगाडा शर्यतीचं वेड लागलं. शर्यतीत जिंकल्यावर कोंबडा किंवा मेंढा मिळायचा. पण बैलगाडा शर्यत जिंकल्यावरच त्यांना समाधान मिळायचं. बैलगाडा शर्यतीचे ४० ते ५० बैल त्यांनी राखून ठेवले होते.

राज्यात जिथे कुठेही बैलगाडा शर्यतीचे आयोजन केलं जायंच, तिथे फडके आवर्जून उपस्थिती दर्शावायचे. विशेषत: बैलगाडा शर्यतीत नंबर एक च्या स्थानावर असलेला बैल खरेदी करण्यासाठीही ते प्रयत्न करायचे. तसंच ते राजकारणतही सक्रीय होते. शेतकरी कामगार पक्षात असताना त्यांनी सामाजिक क्षेत्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केलं होतं. पनवेल परिसरात त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमही राबविले. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. परंतु, आज २१ फेब्रुवारीला त्यांचं निधन झाल्याने राज्यभरात शोक व्यक्त केला जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in