बाळासाहेब थोरात मनाचा मोठेपणा असलेले नेते - उद्धव ठाकरे

लोकशाही संपुष्टात आली आहे. ज्यांच्या बरोबर पंचवीस वर्षे मैत्री केली त्यांनी गद्दारी केली; मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी गद्दारी केली नाही.
बाळासाहेब थोरात मनाचा मोठेपणा असलेले नेते - उद्धव ठाकरे
Published on

संगमनेर : महाविकास आघाडी सरकार मध्ये मला अचानक मुख्यमंत्री पण सांभाळावे लागले. अशावेळी सलग आठ वेळा विक्रमी मताधिक्याने निवडून येणारे आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या ज्येष्ठ समजदार व मनाचा मोठेपणा असलेल्या निष्ठावंत नेत्यांनी समजूतदारपणे सांभाळून घेतले असे भावनिक उद्गार राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले आहेत.

संगमनेर बसस्थानक येथे शिवसंवाद यात्रेदरम्यान ते कार्यकर्त्यांशी संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी समवेत खासदार संजय राऊत, माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर मा. खा भाऊसाहेब वाकचौरे, आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी नामदार बाळासाहेब थोरात मित्र मंडळ व काँग्रेस पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीचे नेते व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भव्य दिव्य सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्या पक्ष फोडला जात आहे. लोकशाही संपुष्टात आली आहे. ज्यांच्या बरोबर पंचवीस वर्षे मैत्री केली त्यांनी गद्दारी केली; मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी गद्दारी केली नाही. ते संकट काळात सोबत राहील. आमदार बाळासाहेब थोरात काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते असून, सलग आठ वेळा विक्रमी मताधिक्याने संगमनेर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. विधानसभेतील जेष्ठ अनुभवी सहकारी असून सुद्धा त्यांनी मी अत्यंत नवखा मुख्यमंत्री असताना समजूतदारपणे सांभाळून घेतले यासाठी मनाचा मोठेपणा असावा लागतो. अहमदनगर जिल्ह्यातून आमदार बाळासाहेब थोरात, आ. शंकरराव गडाख यासारखे विश्वासू सहकारी मिळाले. महाराष्ट्राला गद्दारी मान्य नाही. जनता महाविकास आघाडीसोबत आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांच्याच पाठपुराव्यातून निळवंडे धरण व कालव्यासाठी आपण मोठा निधी दिला असून, या कालव्याच्या कामाचे श्रेय हे फक्त आमदार थोरात यांचेच असून आता गद्दारी करून सत्तेवर आलेले श्रेय घेणारे हे टिकोजीराव कोण ? अशी घाणाघाती टिका ही त्यांनी केली.

यावेळी शिवसेनेच्या गद्दार आमदार, केंद्रीय सरकार, भाजप यांच्यावर चौफेर हल्ला चढवत त्यांनी टीका केली. विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने त्यांचे स्वागत केले.

logo
marathi.freepressjournal.in