बांगलादेशने दिली भारतीय कांदा आयातीसाठी परवानगी; पहिल्या टप्प्यात केवळ २०० मेट्रिक टन पाठवता येणार

गेल्या साडेतीन महिन्यांपासून भारतातून ठप्प झालेल्या कांदा निर्यातीला अखेर काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. बांगलादेश सरकारने तेथील आयातदारांना भारतीय कांद्याच्या आयातीसाठी आयात परवाने देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात फक्त २०० मेट्रिक टन कांद्याच्या आयातीस परवानगी देण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे.
बांगलादेशने दिली भारतीय कांदा आयातीसाठी परवानगी; पहिल्या टप्प्यात केवळ २०० मेट्रिक टन पाठवता येणार
Published on

हारून शेख / लासलगाव

गेल्या साडेतीन महिन्यांपासून भारतातून ठप्प झालेल्या कांदा निर्यातीला अखेर काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. बांगलादेश सरकारने तेथील आयातदारांना भारतीय कांद्याच्या आयातीसाठी आयात परवाने देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात फक्त २०० मेट्रिक टन कांद्याच्या आयातीस परवानगी देण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे.

कांदा निर्यातदार आणि शेतकरी संघटनांच्या मते, भारतातील उत्पादन क्षमतेनुसार किमान पाच लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात होणे गरजेचे आहे. त्यामुळे ही सुरुवात दिलासादायक असली, तरी उत्पादक शेतकऱ्यांनी अति अपेक्षा न बाळगण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. जोपर्यंत केंद्र सरकार भारतीय निर्यातदारांना प्रोत्साहन देत नाही, तोपर्यंत कांद्याच्या बाजारभावात मोठी सुधारणा होण्याची शक्यता कमी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज आणि उद्या या दोन दिवसांत २०० टन कांदा बांगलादेशात पाठवण्याची परवानगी मिळाली असून, त्यानंतर हळूहळू मोठ्या प्रमाणात निर्यातीला परवानगी देण्याची शक्यता आहे. मात्र, स्वातंत्र्यदिनाची सुट्टी व आठवड्याच्या शेवटी काही बाजार समित्या बंद असल्याने भाववाढीचे खरे चित्र सोमवारी स्पष्ट होईल.

१३ डिसेंबरपर्यंत आयातबंदी हटली

बांगलादेश सरकारने १३ डिसेंबर २०२५ पर्यंत कांद्यावरील आयातबंदी हटवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भारतीय कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे. गेले काही महिने कांद्याच्या बाजारभावात मोठी चढ-उतार होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती.

भारताला १,७२४ कोटी रुपयांचे परकीय चलन

भारतातील एकूण कांदा निर्यातीपैकी सुमारे ४० टक्के हिस्सा बांगलादेशकडून खरेदी होतो. २०२४-२५ आर्थिक वर्षात भारतातून बांगलादेशला ४.८० लाख मेट्रिक टन कांदा पाठवण्यात आला होता, ज्यातून १७२४ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले. विशेष म्हणजे, बांगलादेश प्रामुख्याने 'दोन नंबर' गुणवत्ता असलेला कांदा खरेदी करतो.

logo
marathi.freepressjournal.in