प्रियकराला भेटण्यासाठी बांगलादेशी तरुणी जळगावात; सहा महिन्यांपासून बेकायदेशीर वास्तव्य, तरुणीला अटक

सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाल्यानंतर प्रियकराला भेटण्यासाठी एका २० वर्षीय बांगलादेशी तरुणीने बेकायदेशीररीत्या भारतात प्रवेश करून जळगावात वास्तव्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
प्रियकराला भेटण्यासाठी बांगलादेशी तरुणी जळगावात; सहा महिन्यांपासून बेकायदेशीर वास्तव्य, तरुणीला अटक
प्रियकराला भेटण्यासाठी बांगलादेशी तरुणी जळगावात; सहा महिन्यांपासून बेकायदेशीर वास्तव्य, तरुणीला अटक
Published on

जळगाव : सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाल्यानंतर प्रियकराला भेटण्यासाठी एका २० वर्षीय बांगलादेशी तरुणीने बेकायदेशीररीत्या भारतात प्रवेश करून जळगावात वास्तव्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच शनिपेठ पोलिसांनी रविवारी रात्री छापा टाकून संबंधित तरुणीला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशातील कोनिका राणी शामलचंद्र राय (२०) हिची सोशल मीडियाच्या माध्यमातून चिन्मय जगन्नाथ बाला (२४, रा. नरेंद्रचक, हुबळी, पश्चिम बंगाल) याच्याशी ओळख झाली होती. या ओळखीचे पुढे प्रेमात रूपांतर झाले. त्यानंतर चिन्मयने तिला भारतात येण्यास सांगितले. त्यामुळे कोनिकाने ५ डिसेंबर २०२४ रोजी वैध कागदपत्रांशिवाय छुप्या मार्गाने भारतीय सीमेत प्रवेश केला. त्यानंतर ती जळगावात आली आणि जोशीपेठेतील भोई गल्ली परिसरात चिन्मयसोबत राहत होती. चिन्मय हा जळगावात सोनार कारागीर म्हणून काम करतो.

प्रियकराला भेटण्यासाठी बांगलादेशी तरुणी जळगावात; सहा महिन्यांपासून बेकायदेशीर वास्तव्य, तरुणीला अटक
नसरापूर प्रकरणाचा तपास SIT कडे; आरोपीला ७ मेपर्यंत पोलीस कोठडी; खटला फास्ट ट्रैक कोर्टात चालणार, राज्य सरकारकडून कुटुंबाला लेखी हमी

दरम्यान, एक बांगलादेशी महिला अवैधरित्या शहरात वास्तव्य करत असल्याची माहिती शनिपेठ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी रात्री पोलीस पथकाने चिन्मयच्या घरावर छापा टाकला. चौकशीदरम्यान त्याच्यासोबत बांगलादेशातून अवैधपणे भारतात आलेली कोनिका राणी शामलचंद्र राय राहत असल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, कोनिका राणीला अटक करण्यात आली आहे, तर चिन्मय बाला याला नोटीस बजावण्यात आली आहे. ही तरुणी केवळ प्रेमापोटी भारतात आली होती की यामागे आणखी काही संशयास्पद कारण आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in