Bank Holidays: आजपासून पाच दिवसा बँकांना सुट्टी ; नागरिकांपुढे एटीएम किंवा ऑनलाईनचा पर्याय

आजपासून बँका सलग ५ दिवस बंद राहणार आहेत. यादरम्यान बँकांच्या शाखांमध्ये कोणतही काम होणार नाही.
Bank Holidays: आजपासून पाच दिवसा बँकांना सुट्टी ; नागरिकांपुढे एटीएम किंवा ऑनलाईनचा पर्याय

दिवाळी निमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. अशात आजपासून बँका सलग ५ दिवस बंद राहणार आहेत. यादरम्यान बँकांच्या शाखांमध्ये कोणतही काम होणार नाही. भारतीय रिझर्व्ह बँक(RBI) प्रत्येक महिन्याच्या सुरुवातील बँकांच्या सुट्यांची यादी जारी करते. जी वेगवगेळ्या राज्यांमध्ये होणाऱ्या सण आणि कार्यक्रमांवर अवलंबून असते.

आता नोव्हेंबर-२०२३ च्या सुट्यांची जाहीर झालेली यादी पाहिली तर १० नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत बँकांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यांसाठी आरबीआयने जारी केलेल्या बँक सुट्टीच्या यादीनुसार महिन्यात एकूण १५ बँकिंग सुट्ट्या होत्या. त्यापैकी अनेक सुट्ट्या आधीच झाल्या आहेत. यात शनिवार आणि रविवार या साप्ताहित सुट्ट्यांचा देखील समावेश असतो.

११ नोव्हेंबर शनिवार रोजी बँकांना नियमित सुट्टी आहे. तर १२ नोव्हेंबर रोजी रविवारमुळे बँक बंद राहणार आहे. सोमवार १३ नोव्हेंबर रोजी गोववर्धन पूजा/लक्ष्मी पूजा(दिपावली) मिमित्ताने सुट्टी राहणार आहे. मंगळवार १४ नोव्हेंबर रोजी बळी प्रतिपदेच्या निमित्ताने बँका बंद राहणार आहेत. तर बुधवार १५ नोव्हेंबरला भाऊबीज निमित्ताने बँकांना सुट्टी राहणार आहे.

या दरम्यान ग्राहकांना अनेक अडचणींना सामना करावा लागलो. बँका बंद असल्याने तुम्ही बँकेत जाऊन काम करु शकणार नाही. मात्र आपण ऑनलाईन पद्धतीने आपलं काम करु शकता. तसंच रोखीने व्यवहार करण्यासाठी तुम्ही एटीएमचा वापर करु शकता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in