बँक ऑफ इंडियाच्या पेण शाखेला आग, किरकोळ मालमत्तेचे नुकसान

नगरपरिषदेच्या अग्निक्षमन दलाच्या जवानांनी ३ तासांच्या अथक परिश्रमानंतर ही आग विझवण्यात यश आले. या आगीत बँकेच्या सर्वर रूम जळून ख़ाक
बँक ऑफ इंडियाच्या पेण शाखेला आग, किरकोळ मालमत्तेचे नुकसान

पेण शहराच्या मध्यभागी असलेल्या बँक ऑफ इंडिया बँकेच्या पेण शाखच्या कर्ज विभागात काल रात्री ९:३० च्या सुमारास आग लागली. बँकेच्या सर्वर रुममधील तांत्रिक बिघाडाने ही आग लागल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी नवशक्ति सोबत बोलताना सांगितले. या आगीत बँकेच्या किरकोळ मात्मात्तेच् नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ग्राहकांची सर्व कागदपत्रे ही सुरक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ही आग लागल्यावर बँक परिसरात खळबळ माजली आणि बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात जमली. पेण नगरपरिषदेच्या अग्निक्षमन दलाच्या जवानांनी ३ तासांच्या अथक परिश्रमानंतर ही आग विझवण्यात यश आले. या आगीत बँकेच्या सर्वर रूम जळून ख़ाक झाला असून काही कागदपत्रे, खुर्ची, टेबल व इतर मालमत्तेच नुकसान झाले आहे.

यावेळी घटनास्थळी पेण तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे, पोलीस निरिक्षक देवेंद्र पोळ, नगरपालिका अधिकारी नरुटे, नायब तहसीलदार दादु कालेकर आणि बँकेचे कर्मचारी यांनी त्वरित धाव घेतली.

आगीवर नियंत्रण पेण नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या एका कर्मचाऱ्याला आगीच्या धुरामुळे श्वसनाचा त्रास झाला असल्याचा प्रकार यावेळी घडला. या कर्मचाऱ्यांकडे सेफ्टी गॉगल, मास्क तसेच हॅंड ग्लोव्ज अशा प्रकारचे कोणतेही स्व सुरक्षा साधने वापरत नसल्याचे निदर्शनास आले. या बाबत नगरपरिषद् अधिकारी नरूटे यांना विचारणा केली असता अग्निक्षमन कर्मचाऱ्यांना लवकरच सुरक्षा साहित्य दिले जाईल, असे सांगितले. 

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in