बारामती बसस्थानक स्वच्छतेत पहिले; पटकावले एक कोटींचे बक्षीस

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्वच्छता, शिस्त आणि टापटिपपणाच्या संकल्पनांना प्रत्यक्ष कृतीत उतरवणाऱ्या पुणे विभागातील बारामती बसस्थानकाने राज्यातील 'अ' वर्ग बसस्थानकांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.
बारामती बसस्थानक स्वच्छतेत पहिले; पटकावले एक कोटींचे बक्षीस
बारामती बसस्थानक स्वच्छतेत पहिले; पटकावले एक कोटींचे बक्षीसPhoto : X
Published on

मुंबई : स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्वच्छता, शिस्त आणि टापटिपपणाच्या संकल्पनांना प्रत्यक्ष कृतीत उतरवणाऱ्या पुणे विभागातील बारामती बसस्थानकाने राज्यातील 'अ' वर्ग बसस्थानकांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे या स्थानकाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे तसेच तिरोडा आणि अकोलेने ही राज्यात अव्वल क्रमांक मिळवला आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाचा वार्षिक निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. या अभियानात उत्कृष्ट कामगिरी राज्यातील ५४ बसस्थानकांना एकूण ३ कोटी रुपयांची बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत तर एसटी महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त १ जूनला मुंबई येथे या बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. करणाऱ्या सन च्या २०२५-२६ सर्वेक्षणानुसार राज्यातील 'अ' वर्गात पुणे विभागातील बारामती बसस्थानकाने ९७ गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला, 'ब' वर्गात भंडारा विभागातील तिरोडा बसस्थानकाने ९७ गुण मिळवत अव्वल स्थान मिळवले, तर 'क' वर्गात अहिल्यानगर विभागातील अकोले बसस्थानकाने ९८ गुणांसह राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला.

स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक ही केवळ स्पर्धा नसून प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्याची व्यापक चळवळ आहे. राज्यातील प्रत्येक बसस्थानक आदर्श, स्वच्छ आणि प्रवासीहितैषी व्हावे, या उद्देशाने हे अभियान प्रभावीपणे राबवण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बसस्थानकांचा आदर्श इतरांनीही घ्यावा.

- प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री

प्रवाशांसाठी आकर्षक, स्वच्छ, आनंददायी वातावरण

या अभियानामुळे बसस्थानक परिसरातील स्वच्छता, प्रवाशांसाठी उपलब्ध मूलभूत सुविधा, सुशोभीकरण, स्वच्छतागृहांची देखभाल, हरित उपक्रम तसेच कर्मचारी सहभाग या सर्व बाबींमध्ये सकारात्मक बदल घडून आला आहे. अनेक बसस्थानकांनी स्थानिक स्तरावर अभिनव उपक्रम राबवून प्रवाशांसाठी आकर्षक, स्वच्छ आणि आनंददायी वातावरण निर्माण केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in