बारामतीत कालव्याला भगदाड; हजारो लिटर पाणी वाया, वाहतूक ठप्प

बारामती तालुक्यातील पिंपळी लिमटेक येथे निरा डावा कालवा फुटल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. हजारो लिटर पाणी वाया गेले असून, फुटलेल्या कालव्याचे पाणी जगद्‌गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी महामार्गावर आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. कालव्यातील पाणी शेतकऱ्यांच्या शेतात, घरांमध्ये घुसून मोठे नुकसान झाले आहे. काटेवाडी-भवानीनगर हा रस्ताही तूर्तास बंद करण्यात आला आहे.
बारामतीत कालव्याला भगदाड; हजारो लिटर पाणी वाया, वाहतूक ठप्प
Published on

पुणे : बारामती तालुक्यातील पिंपळी लिमटेक येथे निरा डावा कालवा फुटल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. हजारो लिटर पाणी वाया गेले असून, फुटलेल्या कालव्याचे पाणी जगद्‌गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी महामार्गावर आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. कालव्यातील पाणी शेतकऱ्यांच्या शेतात, घरांमध्ये घुसून मोठे नुकसान झाले आहे. काटेवाडी-भवानीनगर हा रस्ताही तूर्तास बंद करण्यात आला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून बारामती तालुक्यात संततधार पाऊस पडत आहे. आज तब्बल १३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली, ज्यामुळे ओढ्या-नाल्यांना पूर येऊन अनेक घरांमध्ये पाणी शिरले. यामुळे जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले आहे. निंबोडी, शेटफळगढे, मदनवाडी, भिगवण या अतिवृष्टीग्रस्त भागांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. मदनवाडीमध्ये पूल आणि रस्ता खचला असून, भिगवण बस स्थानकाचेही नुकसान झाले आहे. बारामती-इंदापूर रस्त्यावरील पताकाचा ओढा तुडुंब भरून वाहत असून, हे पुराचे पाणी ढेकळवाडी येथील ओढ्याला मिळाल्याने भवानीनगर, ३५ फाटा, विजयनगर परिसरातून येणारे पाणी गावात घुसले. यामुळे गावातील साखरेवाडा व मोठ्या संख्येने घरे पाण्याखाली गेली आहेत. ढेकळवाडी-काटेवाडी रस्ता बंद झाला असून, शेतांना तळ्याचे स्वरूप आले आहे.

पाण्याखाली गेली आहेत. ढेकळवाडी-काटेवाडी रस्ता बंद झाला असून, शेतांना तळ्याचे स्वरूप आले आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांना नुकसानीला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. अनेक पाणी शिरल्यामुळे शेतांना शेततळाचे स्वरूप प्राप्त झाल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले.

नुकसानीचे पंचनामे करायला सुरुवात

राज्यात कोसळणाऱ्या पावसामुळे शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बारामती तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त भागांची सुनित्रा अजित पवार यांनी स्वतः पाहणी केली असून, अजित पवार यांनी निंबोडी, शेटफळगढे, मदनवाडी, भिगवण, तसेच इंदापूर तालुक्यातील सणसर आणि भवानीनगर येथील नुकसानग्रस्त कॅनॉल व अतिवृष्टीग्रस्त ठिकाणांना भेट दिली आहे. त्यांनी तालुक्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी 'अलर्ट मोड'वर असल्याचे सांगितले असून, नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.

या भागातील नागरिकांना फटका बसला असून, पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देणे आवश्यक असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क झाला असून अनेक ठिकाणी मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in