अजित पवार यांना बारामती कोर्टाचे समन्स

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २०१४ सालच्या निवडणुकीमध्ये केलेल्या एका वक्तव्याप्रकरणी त्यांना बारामती कोर्टाकडून समन्स बजावण्यात आले आहे. त्यानुसार १६ डिसेंबर रोजी अजित पवार यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अजित  पवार
अजित पवार संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २०१४ सालच्या निवडणुकीमध्ये केलेल्या एका वक्तव्याप्रकरणी त्यांना बारामती कोर्टाकडून समन्स बजावण्यात आले आहे. त्यानुसार १६ डिसेंबर रोजी अजित पवार यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

माजी आयपीएस अधिकारी सुरेख खोपडे यांनी अजित पवारांच्या निवडणुकीतील वादग्रस्त वक्तव्याविरोधात याचिका दाखल केली आहे. खोपडे हे त्यावेळी ‘आप’कडून निवडणूक लढवत होते. या याचिकेवर आता बारामती कोर्टाने अजित पवारांना समन्स बजावले आहे.

पुण्यात नववीच्या विद्यार्थ्याने वर्गातच मित्राचा गळा चिरला

खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत जखमी झालेल्या १५ वर्षीय मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नववीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांमध्ये वार्षिक समारंभाच्या आयोजनावरून वाद झाला होता. मंगळवारी दुपारी अडीच वाजता तक्रारदार मुलगा वर्गात बसलेला असताना, आरोपी मुलाने पाठीमागून त्याच्या गळ्यावर धारदार काचेच्या तुकड्याने वार केले. मुलाच्या या कृत्यामुळे वर्गातील अन्य विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली. त्याचवेळी आरोपीने जखमी मुलाला ‘मी तुझी विकेट पाडीन’, अशी धमकी दिली. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी जखमी मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल केले. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी विद्यार्थ्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

...तर गावचे पाणी बंद करू!

अजित पवारांनी २०१४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मासाळवाडी या गावामध्ये आमच्या उमेदवाराला मतदान केले नाही, तर गावचे पाणी बंद करू, असे वक्तव्य केले होते. तसेच तुमचा पाणीप्रश्न दोन महिन्यांत सोडवतो, परंतु मतदान आम्हालाच करा, असे अजित पवार यांनी म्हटले होते.

logo
marathi.freepressjournal.in