Baramati plane crash: बारामतीत शिकाऊ विमानाला अपघात ; सुदैवाने जीवितहानी नाही

या अपघातात शिकाऊ पायलट शक्ती सिंग जखमी झाले आहेत. सुदैवाने यात कुठलीही गंभीर दुखापत झाली नाही.
Baramati plane crash: बारामतीत शिकाऊ विमानाला अपघात ; सुदैवाने जीवितहानी नाही
Published on

पुण्यातील बारामती तालुक्यातील कटफल येथे शिकाऊ विमान कोसळलं. बारामतीतील रेडबर्ड कंपनीचे निकाऊ विमान लँडिंग करताना कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. यामद्ये पायलट शक्ती सिंग यांना किरकोळ दुखापत झाली आहे. बारामतीत पायलटला ट्रेनिंग दिलं जातं. या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे.

कटफल इथे वैमानिकांना प्रशिक्षण दिलं जातं. अनेकर पायलट इथे विमान उडवण्याचं प्रशिक्षण घेऊन तयार होतात. गेल्या काही दिवसापासून इथे जोरदार प्रशिक्षण सुरु आहे. पुण्यासह शेजारील जिल्ह्यात देखील विमानाच्या घिरट्या पाहालया मिळतात. आजही असंच ट्रेनिंग सुरु होतं. या दरम्यान, कटफलमध्ये विमान कोसळलं. दुपारी जार वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या अपघातात शिकाऊ पायलट शक्ती सिंग जखमी झाले आहेत. सुदैवाने यात कुठलीही गंभीर दुखापत झाली नाही.

दरम्यान, सांगली जिल्ह्यातील अनेक भागात कालपासून आकाशात विमानाच्या घिरट्या सुरु आहेत. काल आटपाडी भागात आणि आज तासगाव, सांगली भागात घिरट्या घातलेल्या नागरिकांना दिसून आल्या. ही बारामतीतील प्रशिक्षण केंद्राची शिकाऊ विमाने असल्याची माहिती समोर येत आहे. खूप कमी उंचीवरुन ही विमाने आकाशात घिरट्या घालतात.

logo
marathi.freepressjournal.in