

मुंबई : बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील प्रचाराची मंगळवारी सांगता झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी बारामतीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी प्रचारसभा घेतली, तर फडणवीस यांनी सोमवारी राहुरीत भाजप उमेदवाराच्या प्रचारसभेत भाग घेतला होता.
उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या आणि निधनामुळे रिक्त झालेल्या अनुक्रमे बारामती, राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या, गुरुवारी मतदान होत आहे. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्यासह २३ तर राहुरीत ७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. बारामतीत महाविकास आघाडीने सुनेत्रा पवार यांना पाठींबा दिला आहे. मात्र, राहुरीत भाजपचे अक्षय कर्डिले आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गोविंद मोकाटे यांच्यात मुख्य लढत होत आहे. येथे वंचित बहुजन आघाडीनेही उमेदवार उभा केला आहे.