बारणे यांच्या विरोधकांना हा मतदारसंघच माहिती नाही; आमदार महेंद्र थोरवे यांची टीका

कर्जत - खालापूर मतदारसंघातील महायुतीच्या समन्वय समितीची बैठक कर्जतमध्ये आयोजिली होती. त्यावेळी थोरवे बोलत होते.
बारणे यांच्या विरोधकांना हा मतदारसंघच माहिती नाही; आमदार महेंद्र थोरवे यांची टीका

विजय मांडे

कर्जत : 'गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली खासदार बारणे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात ऐतिहासिक विकासकामे केली आहेत. त्यामुळे संपूर्ण मतदारसंघाचे चित्र बदलले आहे. विरोधकांकडे प्रचारासाठी कोणताही मुद्दा नसल्यामुळे त्यांनी धादांत खोटा प्रचार चालवला आहे. प्रत्यक्षात विरोधकांना हा मतदारसंघच माहिती नाही, ही वस्तुस्थिती आहे, अशी टीका आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत येथे बोलताना केली.

कर्जत - खालापूर मतदारसंघातील महायुतीच्या समन्वय समितीची बैठक कर्जतमध्ये आयोजिली होती. त्यावेळी थोरवे बोलत होते. थोरवे म्हणाले की, बारणे यांनी गेल्या दहा वर्षांत मावळ मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात काम केलेले असताना, त्यांनी कामच केले नाही, अशी टीका करणाऱ्या विरोधकांना हा मतदारसंघच माहित नाही, असे म्हणावे लागेल.

logo
marathi.freepressjournal.in