बावनकुळेंनी कॅसिनोमध्ये ३ तासात साडेतीन कोटी उधळले, माझ्याकडे 5 व्हिडीओ आणि 27 फोटो ; संजय राऊत यांचा दावा

मोदी परदेशात जाऊन जे पितात तेच आदित्य ठाकरे पितात, मोदींचा आणि आदित्य ठाकरेंचा ब्रँड सेम असल्याचं देखील राऊत म्हणाले.
बावनकुळेंनी कॅसिनोमध्ये ३ तासात साडेतीन कोटी उधळले, माझ्याकडे 5 व्हिडीओ आणि 27 फोटो ; संजय राऊत यांचा दावा

चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊमधील कॅसिनोमधील एक फोटो चांगलाच वायरल होत आहे. बावनकुळे यांचा हा फोटो संजय राऊत यांनी शेअर केला होता. त्यानंतर भाजपने त्याला उत्तर देताना आदित्य ठाकरे यांच्या एक फोटो शेअर केला आहे. त्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे यांनी मकाऊमधील कॅसिनोमध्ये एका रात्रीत चक्क साडेतीन कोटी रुपये उडवले आहेत, पैसे डॉलर्समध्ये उडवले. त्याचे 27 फोटो आणि 5 व्हिडीओ आपल्याकडे आहेत. हे टाकले तर भाजपला त्याचं दुकान बंद करावं लागेल.

माझ्यावर किती लोकांनी टीका केली, आम्ही पण त्या पातळीवर जाऊ शकतो, पण आम्ही जात नाही असं सांगत संजय राऊत म्हटले की, जेवढं खोटं बोलाल तेवढं फसाल. प्रतिउत्तर देऊ नका. बावनकुळे त्या ठिकाणी नसतील तर त्यांनी मी तिथं नव्हतो असं स्पष्ट सांगावं. भाजपकडे देशात ईडी आणि सीबीआय आहेत, आमच्याकडे मकाऊमधील ईडी आणि सीबीआय आहे. बावनकुळेंनी तीन तासांमध्ये साडे तीन कोटी रुपये उधळले, बाकी अजून किती खर्च झाला या गोष्टीचा तपास करावा. आपण एक जबाबदार व्यक्ती आहोत, कुटुंबासोबत आहोत याचं तरी त्यांनी भान ठेवावं.

आदित्य ठाकरेंच्या व्हायरल होणाऱ्या फोटोवर त्यांना प्रश्न विचारल्यानंतर संजय राऊत म्हणाले की, मोदी परदेशात जाऊन जे पितात तेच आदित्य ठाकरे पितात, मोदींचा आणि आदित्य ठाकरेंचा ब्रँड सेम आहे. असं संजय राऊत म्हणाले. यावर आता भाजपकडून काय उत्तर मिळतं याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in