BBA, BMS, BBM व BCA प्रवेश नोंदणीस मुदतवाढ; प्रवेश नोंदणीची अंतिम तारीख २० जुलै

तंत्रशिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, एमबीए (इंटिग्रेटेड), बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन व एमसीए (इंटिग्रेटेड) या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेशाच्या नोंदणीस २० जुलै पर्यंत सीईटी कक्षाने मुदतवाढ दिली आहे.
BBA, BMS, BBM व BCA प्रवेश नोंदणीस मुदतवाढ; प्रवेश नोंदणीची अंतिम तारीख २० जुलै
BBA, BMS, BBM व BCA प्रवेश नोंदणीस मुदतवाढ; प्रवेश नोंदणीची अंतिम तारीख २० जुलैप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : तंत्रशिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, एमबीए (इंटिग्रेटेड), बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन व एमसीए (इंटिग्रेटेड) या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेशाच्या नोंदणीस २० जुलै पर्यंत सीईटी कक्षाने मुदतवाढ दिली आहे. या अभ्यासक्रमाची सीईटी दिलेली आहे, त्या विद्यार्थ्यांनी केंद्रीभूत प्रवेशासाठी नोंदणी करावी, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.

बीबीए, बीएमएस, बीबीएम, एमबीए (इंटिग्रेटेड), बीसीए व एमसीए (इंटिग्रेटेड) या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेशाच्या नोंदणीस ६ जुलै २०२६ पासून सुरुवात झाली आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेश नोंदणीची अंतिम तारीख १६ जुलै होती. त्यास २० जुलै रोजी सायंकाळी ५ पर्यंत मुदतवाढ या देण्यात आली आहे. अभ्यासक्रमास आजपर्यंत ४८ हजार ३६५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मागील वर्षी २०२५-२६ साली ४४ हजार ४८८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

या वर्षी पीसीएम व पीसीबी समूहाच्या विद्यार्थ्यांना बीबीए, बीएमएस, बीबीएम व बीसीए या अभ्यासक्रमाला प्रवेशाची संधी उपलब्ध करून दिली आहे. यानुसार प्रवेश प्रक्रियेमधील दिलेल्या नियमाच्या आधारावर ज्या विद्यार्थ्यांनी २०२६ मध्ये पीसीएम व पीसीबी समूहाची सीईटी दिली आहे, त्यांनीदेखील वरील अभ्यासक्रमाला नोंदणी करावी.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in