"हिंदुत्त्ववादी गुंडांनी 'जय श्रीराम'च्या घोषणा न दिल्यामुळे मुस्लिम मुलांना मारहाण केली", MIM च्या नेत्याचा गंभीर आरोप

हे सर्व प्रकार हिंदू महासभा आणि भाजपच्या नेत्यांकडून दिल्या जाणाऱ्या प्रक्षोभक भाषणांमूळे होत असून यामुळे...
"हिंदुत्त्ववादी गुंडांनी 'जय श्रीराम'च्या घोषणा न दिल्यामुळे मुस्लिम मुलांना मारहाण केली", MIM च्या नेत्याचा गंभीर आरोप

एमआयएम पक्षाते नेते आणि भायखळ्याचे माजी आमदार वारिस पठाण यांनी काल(मंगळवारी) भायखळ्यात काही हिंदुत्त्वादी गुंडांनी मुस्लिम युवकांना थांबवून त्यांना बळजबरी करत 'जय श्रीराम'च्या घोषणा देण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्या तरुणांनी घोषणा देण्यास नकार दिल्याने त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. तसेच, एका 15 वर्षीय मुस्लिम युवतीसोबतही दुर्व्यवहार करत मारहाण केल्याचे त्यांनी म्हटले आहे. पठाण यांनी त्यांच्या 'एक्स'अकाउंटवर याबाबतची पोस्ट केली असून त्यात काही व्हिडिओ जोडले आहेत.

पठाण यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओंमध्ये एका युवकाच्या तोंडातून रक्त येताना दिसत आहे. तर, 'जय श्रीराम'च्या घोषणा दिल्या नाहीत त्यामुळे मारहाण केल्याचे या युवकांकडून सांगण्यात येत आहे. तसेच, एक मुलगी देखील आपले केस ओढल्याचे आणि मारहाण केल्याचे या व्हिडिओत सांगत आहेत. मारहाण झालेल्या एका युवकाला रुग्णालयात घेऊन जातानाही या व्हिडिओत दिसत आहेत.

एमआयएमच्या लोकांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून हस्तक्षेप करत प्रकरण मिटवले आणि जखमीला रुग्णालयात नेल्याचेही पठाण यांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन काही लोकांना ताब्यात घेतल्याची माहितीही पठाण यांनी दिली आहे.

हिंदू महासभा, भाजप नेत्यांवर गंभीर आरोप-

वारिस पठाण यांनी या प्रकरणावरुन हिंदू महासभा आणि भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. हे सर्व प्रकार हिंदू महासभा आणि भाजपच्या नेत्यांकडून दिल्या जाणाऱ्या प्रक्षोभक भाषणांमूळे होत असून यामुळे महाराष्ट्राचे वातावरण खराब होत असल्याचे पठाण यांनी म्हटले आहे. त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला या प्रकरणाची दखल घ्यायला सांगत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in