
कराड : एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन युवतीला लग्न करण्याची बळजबरी करत, तिने नकार देताच तिला एका युवकांसह त्याच्या वडिलांसह भावानेही बेदम मारहाण केल्याची घटना साताऱ्यात घडली आहे. तसेच युवतीला कोयत्याने जीवे मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी रिहान अन्वर शेख,अन्वर शेख,आरिफ अन्वर शेख यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साताऱ्यातील सतरा वर्षीय युवती शहरातील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. रिहान अन्वर शेख हा गेल्या १० ऑक्टो.पासून कॉलेजमध्ये जाऊन त्या युवतीला तू माझ्यासोबत लग्न कर, असे म्हणत लज्जास्पद वर्तन करत होता.
तसेच अन्वर शेख आणि आरिफ शेख हे दोघेही त्या युवतीला दमदाटी करून लग्न करण्यासाठी दबाव टाकत होते. सदर युवती गेल्या गुरु. १९ रोजी दांडिया खेळण्यास गेली होती तिच्या पाळतीवर रिहान होता. दांडियाचा खेळ संपल्यानंतर युवती परतघरी जाण्यासाठी निघाली असता तिला रस्त्यात अडवून तिच्याशी रिहान याने लगट करण्याचा प्रयत्न केला. युवतीने विरोध केला असता, रागावलेल्या रिहानने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हातात कोयता घेऊन जीवे मारण्याची धमकी युवतीला दिली आहे.