जुन्या भांडणाचा राग मनात धरून एकास इळतीने मारहाण

या प्रकरणी गजानन पांचाळ यांच्या फिर्यादीवरून सोनखेड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुन्या भांडणाचा राग मनात धरून एकास इळतीने मारहाण

नांदेड : जुन्या भांडणाचा राग मनात धरून एकास भाजीपाला कापण्याच्या इळतीने मारहाण करण्यात आली. लोहा तालुक्यातील शेळके गावातील रहिवासी गजानन उत्तमराव पांचाळ यांनी पोलीसात तक्रार दिली. टेळकी (ता. लोहा जि. नांदेड) येथे, १७ रोजी रात्री सात वाजताच्या सुमारास गजानन पांचाळ हे जनावरांच्या गोठ्यात गाईचे दुध काढत होते. दरम्यान, आरोपीने जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्यांच्या पाठीमागुन येऊन भाजीपाला कापण्याच्या इळतीने पांचाळ यांच्या डोक्यात, पाठीवर, डाव्या हातावर, मानेवर मारून गंभीर दुखापत केली. या प्रकरणी गजानन पांचाळ यांच्या फिर्यादीवरून सोनखेड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in