‘बीएड’ अभ्यासक्रम पुन्हा एक वर्षाचा होणार; नवीन शैक्षणिक धोरणानुसार २०२६ मध्ये बदल

‘बॅचलर ऑफ एज्युकेशन’ म्हणजेच ‘बीएड’चा कालावधी, स्वरूप आणि अभ्यासक्रम २०२६-२७ पासून बदलणार आहे. हा अभ्यासक्रम पुन्हा एक वर्षाचा होणार आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत हा बदल होत आहे. शैक्षणिक सत्र २०२६-२७ पासून ‘बीएड’चे स्वरूप, कालावधी आणि अभ्यासक्रम बदलणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० अंतर्गत प्रस्तावित बदलामध्ये दहा वर्षांनंतर ‘बीएड्’ अभ्यासक्रम पुन्हा एक वर्षाचा होणार आहे.
‘बीएड’ अभ्यासक्रम पुन्हा एक वर्षाचा होणार; नवीन शैक्षणिक धोरणानुसार २०२६ मध्ये बदल
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे संग्रहित छायाचित्र
Published on

पुणे : ‘बॅचलर ऑफ एज्युकेशन’ म्हणजेच ‘बीएड’चा कालावधी, स्वरूप आणि अभ्यासक्रम २०२६-२७ पासून बदलणार आहे. हा अभ्यासक्रम पुन्हा एक वर्षाचा होणार आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत हा बदल होत आहे. शैक्षणिक सत्र २०२६-२७ पासून ‘बीएड’चे स्वरूप, कालावधी आणि अभ्यासक्रम बदलणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० अंतर्गत प्रस्तावित बदलामध्ये दहा वर्षांनंतर ‘बीएड्’ अभ्यासक्रम पुन्हा एक वर्षाचा होणार आहे.

शिक्षक पात्रता चाचणीचे (टीईटी) नियम आणि निकषांमध्येही बदल केले जाणार आहेत. हे बदल २०२६-२७ मध्ये चार वर्षांच्या एकात्मिक पदवी उमेदवारांच्या बॅचच्या आधी केले जातील. शैक्षणिक धोरणांतर्गत, पायाभूत,पूर्वतयारी, मध्यम आणि माध्यमिक स्तर या चार भागांत शिक्षक तयार केले जातील.

पदवीपूर्व अभ्यासक्रमातील बदलांमुळे विविध बीएड कार्यक्रम पुन्हा सुरू केले जात आहेत. बीएड महाविद्यालयांसाठी नवीन बदलांची अधिसूचना लवकरच जारी केली जाणार आहे. यामध्ये चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. चार वर्षांचा पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना एका वर्षात बीएडसाठी प्रवेश घेता येईल.

तीन वर्षांच्या पदवीधर विद्यार्थ्यांना दोन वर्षांतील बीएडसाठी प्रवेश मिळेल. पदवीनंतर शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना याचा लाभ मिळणार आहे. चार वर्षांचे एकात्मिक बीएड आणि दोन वर्षांचे बीएड शिकणारे विद्यार्थी ‘एमएड’च्या पदवीसाठी प्रवेश घेऊ शकतील.

शैक्षणिक धोरणांतर्गत पायाभूत, पूर्वतयारी, मध्यम आणि माध्यमिक स्तर या चार भागांनुसार शिक्षक तयार केले जातील. पदवीपूर्व अभ्यासक्रमातील बदलांमुळे विविध बीएड कार्यक्रम पुन्हा सुरू केले जाणार असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.

कसा आहे दिव्यांगांसाठी विशेष बीएड अभ्यासक्रम?

विशेष बीएड अभ्यासक्रमामध्ये शिक्षकांना दिव्यांग मुलांना शिकवण्यासाठीचे प्रशिक्षण दिले जाते. दिव्यांग मुलांच्या विशेष गरजा लक्षात घेऊन या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येते. यामध्ये श्रवण, वाक्, दृष्टिदोष, मानसिक अपंगत्व इत्यादी अपंगांसाठी अभ्यासक्रम चालविला जातो. ज्या संस्थांना चार वर्षांचा एकात्मिक बीएड विशेष शिक्षण अभ्यासक्रम सुरू करायचा असेल, ते त्यापुढील शैक्षणिक सत्रासाठी अर्ज करू शकणार आहेत.

चार नव्या अभ्यासक्रमांचा समावेश

बीए बीएड, बीएसस्सी बीएड आणि बीकॉम बीएडची पहिली बॅच २०२३ मध्ये सुरू झाली. २०२५ पासून त्यात शारीरिक शिक्षण, कला शिक्षण, योगशिक्षण आणि संस्कृत शिक्षण हे चार नवीन स्पेशलायझेशन अभ्यासक्रम जोडले जातील.

बारावीनंतर शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यात प्रवेश घेता येणार आहे. बीएड महाविद्यालयांसाठी २०२५ पासून नवीन बदलांची अधिसूचना जारी केली जाणार आहे. यामध्ये चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.

शिक्षक पात्रता चाचणीच्या नियम आणि निकषांमध्येदेखील बदल केले जाणार आहेत. हे बदल २०२७ मध्ये चार वर्षाच्या एकात्मिक पदवी उमेदवारांच्या बॅचच्या आधी केले जातील. याची अधिसूचना लवकरच जारी केली जाईल. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेचे (एनसीटीई) अध्यक्ष प्रा. पंकज अरोरा यांनी ही माहिती दिली.

logo
marathi.freepressjournal.in