पुण्यात प्रेयसीची लॉजवर गळा चिरून हत्या

पुण्यातील स्वारगेट-सातारा रस्त्यावरील शीतल लॉजवर ही घटना घडली आहे.
 पुण्यात प्रेयसीची लॉजवर गळा चिरून हत्या

प्रियकरासोबत लॉजवर गेलेल्या प्रेयसीचा तीक्ष्ण शस्त्राने गळा चिरून खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील स्वारगेट-सातारा रस्त्यावरील शीतल लॉजवर ही घटना घडली आहे. सकाळी रूमची साफसफाई करण्यास आलेल्या कामगाराने रूमची पाहणी केली असता त्याला बाथरूममध्ये तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह दिसून आला. दीप्ती काटमोडे (वय २४) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी व तिचा प्रियकर दोघे रात्री लॉजवर आले होते. दरम्यान, सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे रूमची साफसफाई करण्यासाठी लॉजचा कामगार रूममध्ये गेला. त्यावेळी त्याला बाथरूममध्ये तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह दिसून आला. त्यानंतर त्याने ही माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तिचा गळा चिरून खून केल्याचे समोर आले आहे. माहिती घेतल्यानंतर दीप्ती तिच्या मित्रासोबत लॉजवर रात्री आली असल्याचे समजले. पोलिसांकडून पसार झालेल्या प्रियकराचा शोध घेतला जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in