बेस्ट सेलिंग ईव्ही नवीन टाटा नेक्सॉन ईव्ही मॅक्सचे अनावरण

बेस्ट सेलिंग ईव्ही नवीन टाटा नेक्सॉन ईव्ही मॅक्सचे अनावरण

मॅक्स मोटर्सतर्फे इलेक्िट्रक वाहनांचा श्रेणीत आणखी एक पाऊल पुढे टाकत पर्सनल मोबिलिटी सेगमेंटची देशातील बेस्ट सेलिंग ईव्ही नवीन टाटा नेक्सॉन ईव्ही मॅक्सचे अनावरण करण्यात आले.

प्रदीर्घ कालावधीसाठी इंटरसिटी ट्रॅव्हल्ससाठी शोधात असलेल्या ग्राहकांची गरज पूर्ण करत टाटा मोटर्सने ईव्ही मार्केटचा विस्तार करण्याच्या दिशेने यशस्वी वाटचाल त्यानिमित्त सुरू केली आहे. याप्रसंगी मॅक्स मोटर्सचे संचालक निखिल कराचीवाला, विशाल कराचीवाला, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी अमर दुर्गुळे, संजीव रिदासानी आणि कुशल आचरमल, बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर नरेंद्र देवरे सुनील बारा, कराचीवाला ग्रुपचे सीए रोहित बोरा, टाटा मोटर्सचे प्रोडक्ट स्पेशालिस्ट बेवोब हलदार, मॅक्स मोटर्सचे महाव्यवस्थापक पंकेश चंद्रात्रे यांच्या उपस्थितीत गाडीचे अनावरण करण्यात आले. नवीन नेक्सॉन ईव्ही मॅक्स रुपये १७.७४ लाख किमतीची हाय व्होल्टेज आणि अत्याधुनिक जिपट्रॉन टेक्नॉलॉजीने परिपूर्ण आहे. ही दोन ड्रीम ऑप्शन नेक्सॉन ईव्ही मॅक्स एक्स झेड प्लस, नेक्सॉन ईव्ही मॅक्स एक्स झेड प्लस लक्स आणि तीन आकर्षक रंगात निळा राखाडी, पांढऱ्या रंगात उपलब्ध आहे. स्टॅण्डर्डच्या दृष्टीने ही ड्युएल टोन बॉडी कलरमध्ये येत आहे. त्या ४०.५ टक्के केडब्ल्यूएच लिथीयम आयर्न बॅटरी पॅक सोबत येत आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी टेस्ट ड्राईव्ह उपलब्ध असून शोरूमतर्फे ग्राहकांनी संपर्क साधण्याचे आवाहन महाव्यवस्थापक पंकेश चंद्रात्रे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जुनेद शेख यांनी केले तर आबा निकम, प्रवीण इंदोलीकर, देविका ढगे, पायल डिसूजा, राहुल घबाले आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in