Bhagyashree Atram: बाप-लेकीत होणार विधानसभेची लढत? भाग्यश्री अत्राम यांचा  शरद पवार गटात प्रवेश

Bhagyashree Atram: बाप-लेकीत होणार विधानसभेची लढत? भाग्यश्री अत्राम यांचा शरद पवार गटात प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांची कन्या भाग्यश्री अत्राम यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला.
Published on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांची कन्या भाग्यश्री अत्राम यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाग्यश्री यांना पक्षात थोपविण्याचे केलेले प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात भाग्यश्री यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला.

त्यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पक्षाचे नेते अनिल देशमुख हजर होते. विधानसभेच्या आगामी निवडणुकीत येथे वडील आणि कन्या यांच्यात लढत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in