भारत जोडो न्याय यात्रा १० मार्चला महाराष्ट्रात, 'या' जिल्ह्यांतून जाणार राहुल गांधी; मुंबईत जाहीर सभेने सांगता

यात्रेची सांगता मुंबईत जाहीर सभेने होणार आहे. मुंबईतील सभा १३ अथवा १४ मार्च रोजी होणार आहे.
भारत जोडो न्याय यात्रा १० मार्चला महाराष्ट्रात, 'या' जिल्ह्यांतून जाणार राहुल गांधी; मुंबईत जाहीर सभेने सांगता

मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ १० मार्च रोजी गुजरातमधून नंदूरबार जिल्ह्यात प्रवेश करणार आहे, असे पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले. ही यात्रा नंदूरबार येथून धुळे, मालेगाव आणि नाशिकमध्ये जाणार आहे. नाशिकमध्ये राहुल गांधी हे प्रसिद्ध काळाराम मंदिरात आणि त्यानंतर त्र्यंबकेश्वर येथे जाऊन दर्शन घेणार आहेत. त्यानंतर राहुल गांधी यांची भिवंडी येथे जाहीर सभा होणार आहे.

यात्रेची सांगता मुंबईत जाहीर सभेने होणार आहे. मुंबईतील सभा १३ अथवा १४ मार्च रोजी होणार आहे. पूर्व ते पश्चिम म्हणजे मणिपूर ते मुंबई असा १५ राज्यांमधून जवळपास ६७०० कि.मी.चा प्रवास असून वाटेत ते सर्वसामान्य जनतेला भेटणार आहेत. न्याय हा मुख्य संदेश अधोरेखित करण्याचा गांधी यांचा प्रयत्न असेल, असेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in