Sachin Tendulkar : प्रहारचे बच्चू कडू पाठवणार भारतरत्न सचिन तेंडुलकरला कायदेशीर नोटीस ; काय आहे नेमकं प्रकरण?

सचिन तेंडुलकर हा ऑनलाईन गेमिंग अ‍ॅप्सला समर्थन देत असल्याचं कडू यांच म्हणणं आहे.
Sachin Tendulkar : प्रहारचे बच्चू कडू पाठवणार भारतरत्न सचिन तेंडुलकरला कायदेशीर नोटीस ; काय आहे नेमकं  प्रकरण?

माजी राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू (MLA Bachchu Kadu)यांनी क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा भारतीय क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar)यांना कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचं म्हटलं आहे. याबाबत बोलताना बच्चू कडू म्हणाले की, सचिन तेंडुलकरला पाठवण्यात येणारी नोटीस ही ऑनलाईन गेमिंगअ‍ॅप्ससंदर्भात आहे. सचिन तेंडुलकर हा ऑनलाईन गेमिंग अ‍ॅप्सला समर्थन देत असल्याचं कडू यांच म्हणणं आहे.

यापूर्वी देखील बच्चू कडू यांनी सचिन तेंडूलकर यांना आवाहन केलं होतं. ज्यात त्यांनी सचिन तेंडुलकरने भारतरत्न (भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान) म्हणून तरी अशा जारिरातींमध्ये भाग घेऊ नये किंवा सट्टेबाजीला प्रोत्साहन देऊ नये, असं म्हटलं होतं. आता बच्चू कडू म्हणाले की त्यांनी सचिन तेंडुलकरला पेटीएम फर्स्ट गेमच्या प्रचार मोहिमेतून माघार घेण्याच्या त्यांच्या आवाहनाला उत्तर देण्यासाठी यापूर्वी वेळ दिला होता. मात्र, तेंडुलकरकडून या विषयावर कोणतंही उत्तर न आल्याने आपल्याला कायदेशीर नोटीस पाठवणं भाग पडलं आहे.

काय आहे प्रकरण?

पेटीएम फर्स्ट गेम नावाचा गेमिंग प्रोग्राम ऑनलाईन उपलब्ध आहे. ऑनलाईन पद्धतीने हा गेम खेळून रिअल रोख रक्कम जिंकण्याची परवानगी देते. पेटीएम फर्स्ट हा एक काल्पनिक गेम अ‍ॅप आहे. सध्या बाजारात MPL, Dream11, आणि WinZo,असे इतरही ऑनलाईन गेम अ‍ॅप्स आहेत. यापूर्वी ट्विटरवर जारी केलेल्या निवेदान आमदार बच्चू कडू यांनी भारतरत्न सचिन तेंडूलकरने पेटीएम फर्स्ट गेमची जाहिरात केल्याबद्दल त्यावर आक्षेप घेतला होता.

ते म्हणाले होते की, "सचिन तेंडुलकर हा भारतरत्न आहे. त्याचे जगभर चाहते आहेत. एका भारतरत्न असलेल्या व्यक्तीने पेटीएम फर्स्ट सारख्या जुगार अ‍ॅपची जाहिरात करणं योग्य नाही. मी महाराष्ट्र सरकार आणि सचिन तेंडुलकर यांना विनंती करतो की कृपया या जाहिरातीवर त्वरित बंदी घालावी."

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in