Bhide Wada Smarak : 'भिडेवाडा स्मारका'चा प्रश्न अखेर मार्गी ; पुणे मनपाने सुप्रीम कोर्टातील खटला जिंकला

पुण्याच्या बुधवार पेठेतील मुलींची पहिला शाळा असलेल्या भिडे वाड्याचं रुपांतर आता लवकरच भव्य स्मारकात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Bhide Wada Smarak : 'भिडेवाडा स्मारका'चा प्रश्न अखेर मार्गी ; पुणे मनपाने सुप्रीम कोर्टातील खटला जिंकला
Published on

देशातील मुलींची पहिला शाळा पुण्यात सुरु झाली. महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडे वाड्यातून स्त्री शिक्षणाला सुरुवात केली. मुलींच्या पायातील गुलामीच्या बेड्या ज्या ठिकाणातून तोडल्या गेल्या ते ठिकाणी मात्र अडगळीत आणि दुर्लक्षित झालं होतं. अखेर आज भिडेवाड्यासंदर्भातील सुप्रीम कोर्टात सुरु असलेला खटला पुणे महानगरपालिकेने आणि सरकारने जिंकला आहे. त्यामुळे आता लवकरच या मोडून पडलेल्या वाड्याचं भव्या स्मारकात रुपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पुण्याच्या बुधवार पेठेतील मुलींची पहिला शाळा असलेल्या भिडे वाड्याचं रुपांतर आता लवकरच भव्य स्मारकात होणार आहे. आता तातडीने या कामालासुरुवात करण्यात येणार आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in