'सिकंदर' ठरला सलग दुसऱ्या वर्षी 'भीमा केसरी'चा मानकरी; 'खासदार महोत्सव' अंतर्गत भीमा साखर कारखान्याने भरविला कुस्तीचा भव्य आखाडा

डोळ्याचं पान फेडणारी पै. सिकंदर शेख यांची कुस्ती झाल्यानंतर, मैदानामध्ये एकच जल्लोष करण्यात आला.
'सिकंदर' ठरला सलग दुसऱ्या वर्षी 'भीमा केसरी'चा मानकरी; 'खासदार महोत्सव' अंतर्गत भीमा साखर कारखान्याने भरविला कुस्तीचा भव्य आखाडा
Published on

कोल्हापूर : प्रेक्षकांनी खचाखच भरलेले मैदान, प्रचंड उत्कंठा, टाळ्या अन् हलग्यांच्या कडकडाटाने गजबजलेल्या टाकळी सिकंदरच्या भीमा केसरी कुस्ती मैदानात, मोहोळच्या पै. सिकंदर शेख याने पंजाबच्या उंच्या पुऱ्या पै. प्रदिपसिंगला एकचाक डावावर आस्मान दाखवत, भीमा केसरीचा बहुमान व चांदीची गदा पटकावली. तसेच महेंद्र गायकवाडने देखील उत्तम खेळ दाखवत, पंजाबच्या पै. दिनेश वर विजय मिळविला. या दोन्ही मल्लांनी, कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचं अक्षरश: पारणं फेडलं. भीमा कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी भरविलेल्या या कुस्त्यांच्या मैदानात, सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील जवळपास १००० मल्लांनी हजेरी लावली होती.

खा.धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसाचे औचीत्य साधून, भीमा सहकारी साखर कारखानाच्या वतीने 'खासदार महोत्सव' अंतर्गत, चेअरमन विश्वराज महाडिक यांनी रविवारी भीमा केसरी कुस्त्यांचे जंगी आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर खा. धनंजय महाडिक, ज्येष्ठ नेते मनोहरभाऊ डोंगरे, चेअरमन विश्वराज महाडिक, व्हाईस चेअरमन सतीश जगताप, आ.यशवंत माने, 'विठ्ठल'चे चेअरमन अभिजीत पाटील, प्रा.शिवाजीराव काळुंखे, मातोश्री मंगलताई महाडिक, 'भागीरथी'च्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, पृथ्वीराज महाडिक, वैष्णवी महाडिक, सरपंच विश्वास महाडिक, पवन महाडिक, विजय महाडिक, भाजपा नेते धैर्यशील मोहिते-पाटील, राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील, मानाजी माने, जिल्हा दूध संघाचे व्हा.चेअरमन दीपक माळी, शंकरराव वाघमारे, अंकुश आवताडे, पै.सुनील पाटील, सरपंच दीपक पुजारी, विशाल पवार कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे आदी उपस्थित होते.

'सिकंदर' ने घेतले संसदरत्न 'धनंजय' यांना खांद्यावर

डोळ्याचं पान फेडणारी पै. सिकंदर शेख यांची कुस्ती झाल्यानंतर, मैदानामध्ये एकच जल्लोष करण्यात आला. भीमा केसरीचा बहुमान व मानाची चांदीची गदा खा. धनंजय महाडिक यांच्या हस्ते सिकंदरला देण्यात आली. यावेळी महाराष्ट्र केसरी बहुमान मिळवलेल्या सिकंदरने, संसदरत्न खा. धनंजय मुंडे यांना खांद्यावर उचलून मैदानाचे दोन राउंड मारले. यावेळी तालमीतल्या पैलवानाने घेतले संसदेतल्या पैलवानाला खांद्यावर, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.

logo
marathi.freepressjournal.in