
मुंबई : २०१८ मध्ये घडलेल्या भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणात दलित हक्क कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे यांनी हिंसाचारातील कथित भूमिकेबद्दल आपल्याविरुद्ध दाखल केलेला खटला बंद करा, अशी विनंती करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यास हायकोर्टाने असमर्थता दर्शविली. आपण यापूर्वी एकलपीठ म्हणून संबंधित प्रकरणातील अनेक जामीन याचिका ऐकल्या आहेत. त्यामुळे तेलतुंबडे यांच्या याचिकेवर वेगळ्या खंडपीठाने सुनावणी घेतली पाहिजे, असे स्पष्ट करत न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी याचिकेची सुनावणी अन्य खंडपीठासमोर घेण्याचे निर्देश दिले.
तेलतुंबडे यांना २०१८ मधील भीमा-कोरेगाव हिंसाचार घडवण्यात सहभाग असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.