भोंदू खरातचे वजन घटले, प्रकृतीही खंगली; बारावा गुन्हा दाखल, त्यात ८ गुन्हे महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक, जादूटोण्याशी संबंधित

दुसऱ्यांचे भविष्य सांगणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात दिवसेंदिवस नवनवीन गुन्ह्यांमध्ये अडकत चालला आहे.
भोंदू खरातचे वजन घटले, प्रकृतीही खंगली; बारावा गुन्हा दाखल, त्यात ८ गुन्हे महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक, जादूटोण्याशी संबंधित
भोंदू खरातचे वजन घटले, प्रकृतीही खंगली; बारावा गुन्हा दाखल, त्यात ८ गुन्हे महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक, जादूटोण्याशी संबंधित
Published on

नाशिक : दुसऱ्यांचे भविष्य सांगणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात दिवसेंदिवस नवनवीन गुन्ह्यांमध्ये अडकत चालला आहे. एसआयटी चौकशीत त्याच्या अनेक काळ्या कारनाम्यांची धक्कादायक माहिती बाहेर येत आहे. सततची चौकशी आणि विविध आजार यामुळे त्याचे वजन घटले असून प्रकृतीही खंगत चालली आहे. भोंदू खरातवर आतापर्यंत १२ गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी ८ गुन्हे हे महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक आणि जादूटोण्याशी संबंधित आहेत, तर इतर ४ गुन्हे हे आर्थिक फसवणुकीशी संबंधित आहेत. या सर्वच प्रकरणांत 'एसआयटी'च्या विशेष तपास पथकाकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे. त्यातच खरातचे दररोज व्हायरल होणारे व्हिडिओ हे पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.

भोंदू खरातचे वजन घटले, प्रकृतीही खंगली; बारावा गुन्हा दाखल, त्यात ८ गुन्हे महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक, जादूटोण्याशी संबंधित
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला १७७ कॉल; अंजली दमानियांचा खळबळजनक दावा, उपमुख्यमंत्री शिंदेंनीही साधला १७ वेळा संपर्क

भोंदू अशोक खरात हा काही दिवसांपूर्वी उघडपणे समाजात वावरत होता. पण आज त्याच्यावर छोट्या कोठडीत आयुष्य काढण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पोलिस कोठडीत खरातचे झपाट्याने वजन कमी झाले आहे. विविध आजारांमुळे त्याचे शरीरही खंगले आहे. त्यातच त्याला सततच्या चौकशीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तो सध्या प्रचंड तणावाखाली आहे. त्याला जवळपास ५ आजार असल्याचेही सांगण्यात येत आहे. या प्रकरणी त्याच्यावर औषधोपचार सुरू आहेत. पण सध्या तो हवालदिल झाल्यासारखे वर्तन करत आहे.

भोंदू खरातचे वजन घटले, प्रकृतीही खंगली; बारावा गुन्हा दाखल, त्यात ८ गुन्हे महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक, जादूटोण्याशी संबंधित
भोंदू खरातचा पाय खोलात; व्यवहार केल्यापासून मुलगा बेपत्ता : स्थानिक शेतकऱ्याच्या आरोपानंतर पाथर्डीत संतापाची लाट

कोट्यवधींची मनी लाँड्रिग? रोहित पवार याचा दावा

भोंदू अशोक खरात प्रकरणाला आता आंतरराष्ट्रीय स्तरावरचे गंभीर स्वरूप प्राप्त होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी धक्कादायक दावे केले आहेत. खरात हा केवळ भोंदू नसून मोठ्या आर्थिक गैरव्यवहारांच्या जाळ्याचा भाग आहे. ऑस्ट्रेलिया, दुबईसह चार-पाच देशांमध्ये हवालाच्या माध्यमातून त्याने पैशांची उलाढाल केली असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. या कथित व्यवहारांमध्ये केवळ वैयक्तिक फसवणूक नाही, तर भ्रष्ट अधिकारी आणि काही राजकीय नेत्यांचेही पैसे परदेशात पाठवले गेल्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आ. पवार यांनी केंद्रीय यंत्रणांकडून सखोल चौकशीची मागणी केली आहे. विशेषतः अंमलबजावणी संचालनालय (ईडी) सारख्या संस्थांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. कारण हवाल्याच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांचा संबंध थेट मनी लॉड्रिगशी जोडला जातो. त्यामुळे या प्रकरणाचा तपास केवळ राज्य स्तरावर न होता राष्ट्रीय पातळीवर होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in