मनी लॉनड्रिंगच्या गुन्ह्यात ईडीच्या अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे याचे जावई गिरीश चौधरी यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे. पुणे येथील एमआयडीसी भूखंड घोटाळप्रकरणी गिरीश चौधरी हे दीड वर्षापासून ईडीच्या ताब्यात होते. २०१६ साली एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे, जावाई गिरीश चौधरी यांच्या नावाने जागा खरेदी केल्याचा आरोप होता. एकनाथ खडसे यांनी मंत्रीपदाचा गैरवापर करुन कमी किंमतीत ही जागा खरेदी केली असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी झोटिंग समिती देखील नेमण्यात आली होती.
एकनाथ खडसे हे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये महसूलमंत्री होते. त्यावेळी त्यंनी पुण्यातील बोसरीत ३.१ एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप झाला होता. ३१ कोटी रुपये किंमत असलेल्या या प्लॉटची फक्त ३.७ कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा करण्यात आला होता. अब्बास उकानी यांच्या मालकीचा हा भूखंड एमआयडीसीने १९७१ मध्ये अधिग्रहण केला होता.