भुसावळ रेल्वेमार्गाचे चौपदरीकरण होणार; ८०८.५० किलोमीटर रेल्वे वाहतुकीसाठी कृती आराखडा तयार

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील ८०८.५० किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचे चौपदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भुसावळ रेल्वेमार्गाचे चौपदरीकरण होणार; ८०८.५० किलोमीटर रेल्वे वाहतुकीसाठी कृती आराखडा तयार
भुसावळ रेल्वेमार्गाचे चौपदरीकरण होणार; ८०८.५० किलोमीटर रेल्वे वाहतुकीसाठी कृती आराखडा तयार
Published on: 

नाशिक : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील ८०८.५० किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचे चौपदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे रेल्वे वाहतुकीची क्षमता वाढून प्रवासी आणि मालवाहू गाड्यांच्या संचालनासाठी अतिरिक्त मार्ग उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रेल्वे वाहतूक अधिक वेगवान आणि सुलभ होण्यास मदत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भुसावळ विभागाच्या कार्यक्षेत्रात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांचा समावेश आहे. या विभागात एकूण ७७ ब्लॉक स्थानके असून, दररोज सरासरी २३४ प्रवासी रेल्वेगाड्या आणि १७५ मालगाड्या धावतात. इगतपुरी ते बडनेरा (५२६ किलोमीटर) आणि भुसावळ ते खंडवा (१२३ किलोमीटर) हे या विभागातील प्रमुख रेल्वेमार्ग आहेत.

रेल्वे वाहतुकीतील वाढता ताण आणि संचालनातील अडचणी लक्षात घेऊन वाहतूक गतिमान करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये इगतपुरी, बडनेरा, भुसावळ आणि खंडवा या प्रमुख स्थानकांचा समावेश करून रेल्वेमार्ग चौपदरीकरणाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

वाहतुकीला मिळणार चालना

चौपदरीकरणामुळे रेल्वेमार्गाची वाहतूक क्षमता वाढणार असून, एकाच मार्गावर अधिक गाड्या चालवणे शक्य होणार आहे. तसेच रेल्वेगाड्यांचा वेग वाढण्यासह प्रवासाचा वेळ आणि मालवाहतुकीचा खर्च कमी होण्यास मदत होईल. सध्याच्या रेल्वेमार्गांवरील ताण कमी होऊन इंधनाची बचत आणि प्रदूषणात घट होण्याची अपेक्षा आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)