महाराष्ट्र ATS ची मोठी कारवाई! रत्नागिरीतून संशयिताला अटक

एटीएसच्या नवी मुंबई युनिटने गुप्त माहितीच्या आधारे या वक्तीला पकडलं असून त्याची चौकशी सुरु असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे
महाराष्ट्र ATS ची मोठी कारवाई!  रत्नागिरीतून संशयिताला अटक

महाराष्ट्र दहशतवादी पथकाने (महाराष्ट्र ATS) रत्नागिरीतून चौकशीसाठी एका संशयित व्यक्तीला अटक केली आहे. पुणे पोलिसांनी दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरुन काही दिवसांपूर्वी पुण्यातून दोन संशयित व्यक्तींना अटक केली होती. त्यानंतर आता महाराष्ट्र ATS ने कारवाई करत रत्नागिरीतील एकाला चौकशीसाठी अटक केली आहे. एटीएसच्या नवी मुंबई युनिटने गुप्त माहितीच्या आधारे या वक्तीला पकडलं असून त्याची चौकशी सुरु असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. तसंच या प्रकरणात या व्यक्तीचा सहभाग आढळ्यास त्याच्यावर पुढील कारवाई केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

२२ जुलै रोजी एटीएसने पुण्यातून अटक केलेल्या दोन संशयित दहशतवादी प्रकरणाचा तपास हाती घेतला. त्यांच्या चौकशीतून अनेक नावे समोर आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर एटीएसकडून अनेकांची चौकशी करण्यात येत आहे. मागील सोमवारी मध्यरात्री गस्तीवर असणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल्सनी संशयीत हाचलाची जाणवल्याने मोहम्मद युसुफ आणि मोहम्मद युसुफ खान या दोन दहशतवाद्यांना पकडले. यावेळी त्यांचा तिसरा साथीदार मोहम्मद शहनवाज आलम हा पळून जाण्यास यशस्वी झाला. अटक केलेल्या दोघांना ५ ऑगस्टपर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली.

यापूर्वी या तीनही दहशतवाद्यांनी राजस्थानमधील जयपूर येथे घातपात घडवण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा पासून राष्ट्रीय तपास यंत्रनेकडून(NIA) त्यांचा शोध घेतला जात होता. NIA ने मोहम्मद शहनवाज आलमवर पाच लाख रुपयांचा इनाम जाहीर केला आहे. हे दोघं गेल्या १५ महिन्यांपासून पुण्यातील कोढवा परिसरात राहत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीसांनी त्यांच्या कोंढव्यातील घरी जाऊन तपास केला असता हे इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याचं समोर आलं आहे. त्यांच्याकडे महत्वाचे नकाशे आणि इतर साहित्य आढळून आलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in