शिंदेंच्या सेनेतील बडा नेता भाजपसोबत जाणार; संजय राऊत यांचा दावा

मुंबई : महायुतीतील घटक पक्ष असलेली शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये रुसवेफुगवे सुरू आहेत. शिंदेंच्या सेनेचे महत्त्व कमी झाले असून एकनाथ शिंदे गटातील बडा नेता पक्षातील मोठा गट बरोबर घेऊन भाजपसोबत जाणार, असा सूचक इशारा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला.
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता भाजपसोबत जाणार; संजय राऊत यांचा दावा
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता भाजपसोबत जाणार; संजय राऊत यांचा दावासंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : महायुतीतील घटक पक्ष असलेली शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये रुसवेफुगवे सुरू आहेत. शिंदेंच्या सेनेचे महत्त्व कमी झाले असून एकनाथ शिंदे गटातील बडा नेता पक्षातील मोठा गट बरोबर घेऊन भाजपसोबत जाणार, असा सूचक इशारा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला.

महायुतीत अस्वस्थता पसरली असून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट भविष्यात एकत्र राहणार नाहीत. एकनाथ शिंदेंची गरज संपली आहे हे त्यांच्या लोकांनाही कळून चुकले आहे. त्यामुळे शिंदेंचा पक्ष कधीही भाजपमध्ये विलीन होऊ शकतो किंवा त्यांच्या पक्षातील एक मोठा गट कोकणातील एका नेत्याच्या नेतृत्वाखाली भाजपबरोबर जाईल, हे तुम्ही स्टॅम्पपेपरवर लिहून घ्या, असा दावा राऊत यांनी केला आहे.

संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांच्या अश्रूंचा बाजार केला - राऊतांचा आरोप

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि आरोपी वाल्मिक कराड यांच्यावर सातत्याने आरोप केले. मात्र काही दिवसांपूर्वी धस यांनी मुंडे यांची भेट घेतली आणि राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुरेश धसांनी बीडमध्ये स्वतःचे नेतृत्व उभे करण्याचा प्रयत्न केला. सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या अश्रूंचा बाजार केला, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

logo
marathi.freepressjournal.in