
महाराष्ट्रातील घडामोडींमध्ये आणखी एक भर आज पडत आहे, ती म्हणजे दिल्लीतून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने औरंगाबाद शहराचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला होता. औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नाव बदलून धाराशिव करण्याचा निर्णय या दोन शहरांच्या नव्या नावांचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवला होता. अखेर केंद्र सरकारने दोन्ही नावांच्या नामांतराला हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे आता औरंगाबाद शहराला अधिकृतपणे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराला धाराशिव म्हटले जाणार आहे. सर्व अधिकृत सरकारी कागदपत्रांमध्ये त्याचा उल्लेख असेल.