रायगडमधून मोठी बातमी समोर ; समुद्रकिनारच्या बोटीमध्ये आढळली शस्त्रे

दहीहंडी आणि गणेशोत्सव जवळ आल्याने राज्यात दहशतवादी कारवायांचा कट होता का, अशी चर्चा
रायगडमधून मोठी बातमी समोर ; समुद्रकिनारच्या बोटीमध्ये आढळली शस्त्रे

ऑगस्ट महिना आला की सणासुदीचे दिवस सुरु होतात, गेल्या दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर यंदा लोक सणासुदीचा आनंद संपूर्ण मोकळेपणाने घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातुन खळबळजनक माहिती समोर येत आहे. हरिहरेश्वर किनाऱ्यावर संशयास्पद बोट सापडली असून बोटीत एक शस्त्र सापडल्याचेही सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जिल्ह्यात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून पोलीस यंत्रणाही सतर्क आहे. नाकाबंदी दरम्यान प्रत्येक वाहनाची कसून तपासणीही केली जाते. पुढील तपास एसओटी पथक करत आहेत. सुरुवातीला ही बोट स्थानिक मच्छिमारांची असल्याचा संशय होता. मात्र अखेर या बोटीत AK 47 शस्त्रे सापडल्याने खळबळ उडाली आहे. अखेर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला. 

ही बोट नेमकी कशी आली? याची चौकशी करण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री आणि राज्य सरकारमधील मंत्र्यांशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. धोकादायक शस्त्र सापडल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. याआधीही अतिरेकी समुद्रातून घुसले होते. त्यानंतर सागरी किनाऱ्यावरून कोणताही दहशतवादी हल्ला होऊ नये म्हणून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. दहीहंडी आणि गणेशोत्सव जवळ आल्याने राज्यात दहशतवादी कारवायांचा कट होता का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in