Sharad Pawar ; राज्यातील राजकारणातील मोठी बातमी ; शरद पवार राजकारणातून निवृत्त

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तक प्रकाशन वेळी केली निवृत्तीची घोषणा
Sharad Pawar ; राज्यातील राजकारणातील मोठी बातमी ; शरद पवार राजकारणातून निवृत्त

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या राजकीय जीवनाबाबत मोठी घोषणा केली आहे. “दीर्घ कालावधीनंतर आता कुठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे,’ अशी घोषणा शरद पवार यांनी केली. लोक माझे सांगती या त्यांच्या राजकीय आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनप्रसंगी ते मंगळवारी (२ मे) बोलत होते.

शरद पवार म्हणाले, 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून गेली 24 वर्षे ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. 1 मे 1960 पासून सार्वजनिक जीवनात सुरू झालेला हा संपूर्ण प्रवास गेली 63 वर्षे अखंडपणे सुरू आहे. त्या 56 वर्षांपैकी मी कोणत्या ना कोणत्या सभागृहाचा सदस्य किंवा मंत्री म्हणून सतत काम करत आहे. संसदेतील राज्यसभा सदस्यत्वाची पुढील ३ वर्षे बाकी आहेत. या काळात मी राज्य आणि देशाच्या कारभाराकडे अधिकृत लक्ष देण्यावर भर देईन, याशिवाय मी कोणतीही जबाबदारी घेणार नाही.

logo
marathi.freepressjournal.in