मोठी बातमी! मनोज जरांगे-पाटीलांची स्टेजवरच तब्येत बिघडली

मनोज जरांगे पाटील सध्या धाराशिव दौऱ्यावर असून लोहरा तालुक्यातील माकमी येथे भाषण करत असताना अचानक त्यांची तब्येत बिघडली
मोठी बातमी! मनोज जरांगे-पाटीलांची स्टेजवरच तब्येत बिघडली
Hp

राज्यातील गोरगरिब मराठ्यांना आरक्षण मिळावं अशी मागणी करत मनोज जरांगे-पाटील यांनी आंदोलन छेडलं आहे. मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण द्या, अन्यथा तुम्हाला मराठा समाजाच्या रोषाला समोरं जाव लागेलं अशा इशारा दिला आहे. मराठ्यांना ओबीसी समाजातून आरक्षण देण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे. तर ओबीसी नेत्यांचा मात्र या मागणीला विरोध आहे. मराठा समाजाला स्वतंत्र पण टीकणारं आरक्षण द्या, असं ओबीसी नेत्यांकडून नेत्यांकडून सांगितलं जात आहे.

मनोज जरांगे-पाटील हे मात्र आपल्या मागणीवर ठाम आहे. असं असताना जरांगे यांनी मराठा समाजाला एक करत राज्यभर सभा घेण्याचा धडाका लावत दौरा सुरु केला आहे. मराठा समाजाला जागृत करण्यासाठी आणि वातावरण निर्मीती करण्यासाठ जरांगे महाराष्ट्र दौरा करत असल्याचं सांगितलं जात आहे. दोन वेळा केलेल्या उपोषणामुळे मनोज जरांगे यांच्या तब्येतीवर याचा परिणाम झाला असून आज याचा प्रत्येय आला आहे. भाषण करताना अचानक जरांगे याची तब्येत बिघडल्याची घटना घडली आहे.

मनोज जरांगे पाटील सध्या धाराशिव दौऱ्यावर असून लोहरा तालुक्यातील माकमी येथे भाषण करत असताना ते अचान स्टेजवर बसले. यावेळी त्यांनी बसूनच आपलं भाषण पूर्ण केलं. त्यांची तब्येत बिघडल्याने डॉक्टरांनी स्टेजवरच त्यांची तपासणी केली आणि त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे जरांगे आपला महाराष्ट्र दौरा सोडून आराम करणार का? याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in