नागपुरकरांना मोठा दिलासा ; 'सीएनजी'च्या दरात १० रुपयांनी घसरण

२०२२ च्या ऑगस्ट महिन्यात नागपूरमध्ये सीएनजी ११६ रुपये किलो होता. तोच दर आता ८९.९० रुपयांवर आला आहे.
नागपुरकरांना मोठा दिलासा ; 'सीएनजी'च्या दरात १० रुपयांनी घसरण
Published on

महागाई तसंच इंधनदरवाढीमुळे सध्या सर्वच त्रस्त आहे. अशात नागपूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. नागपूरात सीएनजीच्या दरात मोठी घसरण झाली असून सीएनजीचे दर १० रुपयांनी कमी झाले आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूचे दर कमी झाल्यामुळे नागपूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. एक वर्षात नागपुरात सीएनजी २६ रुपयांनी स्वस्त झाला आहे. २०२२ च्या ऑगस्ट महिन्यात नागपूरमध्ये सीएनजी ११६ रुपये किलो होता. तोच दर आता ८९.९० रुपयांवर आला आहे.

१५ ऑगस्टच्या रात्रपासून हे दर दहा रुपयांनी कमी झाले आहेत. १५ ऑगस्टपर्यंत हे दर ९९.९० रुपये येवढे होते. गेल्यावर्षी या वेळेत हे दर १२६ रुपये एवढे होते. गेल्यावर्षी संपूर्ण देशात नागपुरात सीएनजी महाग होता. आता नागपूरकरांना सीएनजीच्या बाबतीत नागपूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण कधी होईल अस प्रश्न सर्वसामान्या नागरिकांना पडला आहे.

"कंप्रेस्ड नॅचरल गॅस" (CNG) हा नैसर्गिक वायू आहे. परुंतु तो उच्च दाबाने कम्प्रेस्ड केला जातो. या वायूचा वापर वाहनांसाठी केला जातो. इंधनाऐवजी सीएनजीवर वाहने धावतात.

logo
marathi.freepressjournal.in