शरद पवार यांना मोठा धक्का! 'या' बड्या नेत्याने दिला थेट पक्षश्रेष्टींकडे राजीनामा

आपण पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून पक्षश्रेष्ठींकडे आपला राजीनामा सोपवल्याचं सांगितलं आहे
शरद पवार यांना मोठा धक्का! 'या' बड्या नेत्याने दिला थेट पक्षश्रेष्टींकडे राजीनामा

गेल्या काही महिन्यापासून राज्याच्या राजकारणाता मोठ्या प्रमाणावर उलथापालथ होत आहे. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील दोन गट पडले. शिवसेनेत झालेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाला लागलेली गळती काही केल्या कमी होत नाही. आता याच प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील महत्वाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. हा शरद पवार यांच्या गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

अनिल गोटे यांनी आपण पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून पक्षश्रेष्ठींकडे आपला राजीनामा सोपवल्याचं सांगितलं आहे. तसंच आपण राष्ट्रवादी काँग्रेसमधुल बाहेर पडलो असलो तरी सध्या कुठल्याच पक्षात जाणार नसल्याचं जाहीर केलं आहे. धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून गोटे यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे घुसमट होत होती. त्यांनी याबाबत अनेकदा जाहीर कार्यक्रमात नाराजी देखील व्यक्त केली होती.

पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी आपला राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे आपण हा राजीनामा सोपवला असल्याचं त्यांनी धुळे येथील पत्रकार परिषदेत जाहीर केलं आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना देखील याबाबतची कल्पना दिली असल्याचं गोटे यांनी यावेळी स्पष्ट केलं. सध्या कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचं त्यांनी सांगितलं असलं तरी ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in