बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार उद्या मुंबईत ; उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची घेणार भेट

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार उद्या मुंबईत ; उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची घेणार भेट

विशेष म्हणजे नितीशकुमार यांच्यासोबत उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवही येणार आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या मुंबई दौऱ्याची अनेक दिवसांपासून चर्चा होती.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार उद्या मुंबईत येत आहेत. मुंबईत आल्यानंतर ते मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर दुपारी 2.30 वाजता ते शरद पवार यांची भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे नितीशकुमार यांच्यासोबत उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवही येणार आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या मुंबई दौऱ्याची अनेक दिवसांपासून चर्चा होती.

देशात भाजपला रोखायचे असेल तर विरोधी पक्षांची एकजूट आवश्यक आहे. त्यातच आता नितीशकुमार यांनी पुढाकार घेत विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी केवळ एक वर्ष शिल्लक असताना विरोधी पक्षही या निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी नितीशकुमार यांनी दिल्लीत विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेतल्यानंतर ते उद्या मुंबईत येत आहेत. 

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in